बीड वासियांना कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ पहावयास मिळाला- नगराध्यक्ष, कॅरम चषक स्पर्धा २०२१ हैद्राबादच्या मोहम्मद अहेमद यांनी जिंकली

बीड शहरात राज्यस्तरीय ओपन कँरम सिंगल पुरुष स्पर्धा आयोजित नगराध्यक्ष कँरम चषक 2021 स्पर्धा छञपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे संपन्न झाली.

बीड वासियांना कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ पहावयास मिळाला- नगराध्यक्ष, कॅरम चषक स्पर्धा २०२१ हैद्राबादच्या मोहम्मद अहेमद यांनी जिंकली
Carrom Cup Competition 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड शहरात राज्यस्तरीय ओपन कँरम सिंगल पुरुष स्पर्धा आयोजित नगराध्यक्ष कँरम चषक 2021 स्पर्धा छञपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे संपन्न झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना हैद्राबादच्या मोहम्मद अहेमद आणि मुंबईच्या राजेश गोयल यांच्या दरम्यान झाला.यात मोहम्मद अहेमद यांनी अंतिम सामना जिंकत राज्यस्तरीय ओपन कॅरम सिंगल पुरुष आयोजित नगराध्यक्ष कॅरम चषक २०२१ स्पर्धा जिंकली.(Carrom Cup Competition 2021)

द्वितीय बक्षीस राजेश गोयल, तृतीय बक्षीस बीड च्या अकबर मोमीन तर चौथे बक्षीस अकोल्याचे सतिष शर्मा यांनी पटकावले. यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली.
ही स्पर्धा २९ ऑक्टोंबर ते ०१ नोव्हेंबर दरम्यान पार पडली.

यावेळी नगराध्यक्ष बोलतांना म्हणाले की, ज्यावेळी मराठवाडा कॅरम स्पर्धा बीड मध्ये झाली होती त्याच वेळी मी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं होत. आणि आज बीड शहरात राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. यानंतर पुढची स्पर्धा ही अखिल भारतीय स्पर्धा आयोजित करून कॅरम मधील खेळाडूंना व प्रेमींना कॅरम स्पर्धेची मेजवानी देऊ.

बीड वासियांना कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ पहावयास मिळाला. बीड शहरातील खेळाडूंना सर्व सुविधा देण्याचं काम करत आहोत.क्रिकेट, कॅरम, हॉलिबॉल यासंह सर्व खेळासाठी राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित करून शहरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो. यामुळे शहरातील युवा खेळाडूंना शिकायला मिळते व देश पातळीवर खेळण्याची संधी मिळेल.

यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील कॅरम स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे बीड शहराचा प्रथम नागरिक व नगराध्यक्ष म्हणून स्वागत केले व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. आयोजकांना आणि सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या.याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष शेख शाकेर, सभापती सय्यद इलियास, नगरसेवक शुभम धूत, क्रिकेट संघटनेचे जिल्हा सचिव आमेर सलीम,इरफान कुरेशी, हामेद चाऊस, नसीर अन्सारी, रफीक सर यांची प्रमुख उपस्थिती होती.(Carrom Cup Competition 2021)