नऱ्हे गावामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद निधीतून विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

नऱ्हे गावात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद निधीतून पीठ,गिरणी,शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना सायकल भजनी मंडळ वाद्यांचे वाटप करण्यात आले.

नऱ्हे गावामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद निधीतून विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न
Chandrakant Patil News

पुणे- जिल्हा परिषद सदस्य जयश्री भूमकर यांच्या जिल्हा परिषद निधीतून नऱ्हे गावात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद निधीतून पीठ,गिरणी,शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना सायकल भजनी मंडळ वाद्यांचे वाटप करण्यात आले.भाजप आमदार श्री.भीमराव तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील,श्री.भीमराव तापकीर,श्री.सागर भूमकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.(Chandrakant Patil News)

श्री.चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सध्याच्या युगात आपल्या संसाराला हातभार लावण्यास प्रत्येक माता भगिनी प्रयत्नशील असतात.पीठ,गिरणी किंवा शिलाई मशीनच्या माध्यमातून हा हातभार लावायला या माता भगिनींनी मदत होईलमी स्वतः एक मिल कामगाराचा मुलगा असल्याने मला माहित आहे की संसार चालवताना या गोंष्टींची खूप मोठी मदत होते.

उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका बण्याची घाई झाली आहे.महापालिकेचे क्षेत्र वाढवून भूखंडावर आरक्षण टाकून नंतर ते आरक्षण काढून पैसे कमवायचे काम हे लोक करतात असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.संजय राऊत हे शिवसेनेचे एकटेच प्रवक्ते राहिले आहेत व तेच फक्त बोलत राहतात अशी देखील खोचख टिका पाटील यांनी बोलून दाखवली.(Chandrakant Patil News)