मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांसाठी लोकल प्रवासाची घोषणा

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपने थेट दिल्लीवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांसाठी लोकल प्रवासाची घोषणा
Chandrakant Patil news

मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांसाठी लोकल प्रवासाची घोषणा

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपने थेट दिल्लीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. 

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयांची अंमलबजाणी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपने थेट दिल्लीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र हा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला असं भाजपनं म्हटलंय.राज्य सरकारच्या लोकसंदर्भातील निर्णयावर बोलताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारने हा निर्णय उशिरा घेतला असं म्हटलंय.घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच आहे.(Chandrakant Patil news)

नेहमी सकारात्मक राहायला पाहिजे. पण उशीर झाला. व्यापार सुरु झाला पहिजे असं विरोधी पक्ष म्हणत होता. लोकल सुरु व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती. तसेच मंदिरं सुरु व्हायला पाहिजेत. दीड ते दोन वर्षांपासून लोक बंदीस्त आहेत. लोक वेडे व्हायला लागले आहेत. दीड ते दोन वर्षांपासून अर्थार्जन बंद आहे. त्यामुळे हा वर्ग कसा जगला याबद्दल प्रश्नच आहे,असे चंद्रकांत पाटील म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी लोकल सुरु करण्याचा निर्णय घोषित करताना भडकावणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असे वक्तव्य केले. भाजपने काल केलेल्या आंदोनलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले असावे असा अंदाज बांधला जात आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला.

यावेळी बोलताना “हे सरकार आम्ही शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालवतो आहोत असं हे म्हणतात. पण छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेच्या मनातलं कळायचं. मात्र, या सरकारला जनतेच्या मनातलं समजत नाही त्याला काय करणार ?असा टोला चंद्राकांत पाटील यांनी सरकारला लगावला.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सामान्यांना मुंबई लोकलने प्रवास प्रवास करण्यास अनुमती देण्यात येत आहे.अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.(Chandrakant Patil news)

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.