वाडा येथे चेडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व दैवज्ञ भवनाचे उद्घाटन

पालघर जिल्ह्यातील वाडा गावचे जागृत देवस्थान श्री चेडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठापना,कळस रोहण व दैवज्ञ भवन वास्तु उदघाटन समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर  यांच्या हस्ते तर संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन दैवज्ञ ज्ञाती बांधव भिवंडी चे आमदार मा.महेशजी चौगुले यांच्या हस्ते दि १९ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

वाडा येथे चेडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व दैवज्ञ भवनाचे उद्घाटन
Chedoba temple and Daivajna Bhavan inauguration

वाडा येथे चेडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व दैवज्ञ भवनाचे उद्घाटन

पालघर जिल्ह्यातील वाडा गावचे जागृत देवस्थान श्री चेडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठापना,कळस रोहण व दैवज्ञ भवन वास्तु उदघाटन समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर  यांच्या हस्ते तर संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन दैवज्ञ ज्ञाती बांधव भिवंडी चे आमदार मा.महेशजी चौगुले यांच्या हस्ते दि १९ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

वाडा प्रतिनिधी सत्यवान तरे:

पालघर जिल्ह्यातील वाडा गावचे जागृत देवस्थान श्री चेडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठापना,कळस रोहण व दैवज्ञ भवन वास्तु उदघाटन समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर  यांच्या हस्ते तर संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन दैवज्ञ ज्ञाती बांधव भिवंडी चे आमदार मा.महेशजी चौगुले यांच्या हस्ते दि १९ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आले .सदर कार्यक्रम दैवज्ञ ज्ञाती सोनार (दैवज्ञ ब्राह्मण) समाज ,वाडा संस्थेतर्फे आयोजित हा सोहळा होमहवन, मंत्रोच्चाराच्या घोषात उत्साहात  संपन्न झाला.(Chedoba temple and Daivajna Bhavan inauguration)


या वेळी दैसप सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, कार्याध्यक्ष नंदकिशोर वळीवडेकर, सहा चिटणीस परेश पोतदार, दैसप ठाणे विभागाचे अजित गोरे,उल्हास घुमरे, विनोद मडकईकर,अजित सातघरे  तसेच विजय हाटकर,कल्याण दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत देहेरकर,भिवंडी दैवज्ञ ज्ञाती ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त चंद्रमोहन पिंगळे,अध्यक्ष भालचंद्र मदन आदि मान्यवर अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते.दैवज्ञ ज्ञाती सोनार समाजाचे माजी अध्यक्ष वासुदेव वगळ यांच्या कडून संस्थेची धुरा घेतल्यानंतर गणेश धोत्रे ,मनिष देहेरकर,महेश आंबवणे' आनंद आंबवणे शैलेश आंबवणे सचिन देहेरकर  योगेश देहेरकर स्वप्नील वगळ आदि युवा मंडळींनी एकसंघपणे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून संस्थेचे कार्य जोमाने पुढे सुरू ठेवले.कुठल्याही पदाची अपेक्षा न करता  मंदिराचा जीर्णोद्धार व दैवज्ञ भवनाचे स्वप्न स्वबळावर पूर्ण केल्याचे आनंदयुक्त समाधान यावेळी या मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत होते.


संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांची परंपरा असंलेल्या श्री चेडोबा देवाचा उत्सव दरवर्षी  साजरा केला  जातो.श्री चेडोबा देव नवसाला पावतो असा विश्वास स्थानिक ज्ञाती बंधूंभगिनींचा या देवस्थानावर आहे.याप्रसंगी काही मान्यवरांनी देणग्या जाहीर करून त्यांचे धनादेश संस्थेच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले व आपली मनोगते व्यक्त केली.मुंबई, ठाणे , पालघर जिल्ह्यातील ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, आणि विविध ठिकाणच्या महिला, युवा मंडळाच्या ज्ञाती  कार्यकर्ते कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वाडा येथे समाजाच्या हॉल चे स्वप्न साकार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. आरती व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.(Chedoba temple and Daivajna Bhavan inauguration)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/