मुरबाड तालुक्यात चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात बुथ बांधणी अभियानाची सुरवात

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले आदेशाने व जिल्हाध्यक्ष श्री.दयानंद चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष श्री.चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात बुथ बांधणी अभियानाची सुरवात काँग्रेस भवन, मुरबाड येथे करण्यात आली.

मुरबाड तालुक्यात चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात बुथ बांधणी अभियानाची सुरवात
Chetan Singh Pawar

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:
 
 २४ सप्टेंबर २०२१ रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले आदेशाने व जिल्हाध्यक्ष श्री.दयानंद चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष श्री.चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात बुथ बांधणी अभियानाची सुरवात काँग्रेस भवन, मुरबाड येथे करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौ.संध्या कदम, तालुका मुख्यसमन्वयक श्री.गुरूनाथ पष्टे, आद.राहुलजी गांधी विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, महिला शहरअध्यक्ष शुभांगी भराडे, विनोद आगाणे, नेताजी लाटे, मारुती टोहके, बिपिन भावार्थे, भगवान तारमळे, हरिश्चंद्र पष्टे, युवक कॅांग्रेसचे तालुका पदाधिकारी, सर्व पंचायत समिती गणप्रमुख आदी उपस्थित होते. केंद्रात मोदी-भाजपा सरकार आल्यामुळे जितकं नुकसान काँग्रेस पक्षाचे झाले आहे.(Chetan Singh Pawar)

त्यापेक्षा कित्येक पटीने देशाचे मानसिक, आर्थिक नुकसान झाले असुन देश व राज्यघटना वाचवायचा असल्यास पुन्हा एकदा केंद्रामध्ये कॅांग्रेसची सत्ता आणावी लागेल आणि त्यासाठी लोकसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवुन बुथ बांधणी झाली पाहिजे म्हणुन ग्रामस्तरीय बुथ बांधणी अभियानास सुरवात करत असल्याचे प्रतिपादन यावेळी चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले. ई-पिक पाणी संदर्भात मार्गदर्शन गुरूनाथ पष्टे यांनी केले तर विद्यार्थी काँग्रेसच्या बांधणी संदर्भात धनाजी बांगर यांनी माहिती दिली व आभार प्रदर्शन अनिल चिराटे यांनी केले.सदरील बैठकीनंतर तालुक्याचे नवीन तहसिलदार श्री.संदीप आवारी यांची तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट देवुन तालुक्यामध्ये स्वागत केले व प्रशासन हे शेतकरीभीमुख असावे अशी विनंती केली.(Chetan Singh Pawar)