ना.बाळासाहेब थोरात यांनी अनावरण केलेल्या मानपत्राव्दारे डॅाक्टरांचा चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते सन्मान !

मुरबाड शहर व तालुका तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील खाजगी व शासकीय डॅाक्टर यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल आद.राहुलजी गांधी विचारमंच, ठाणे जिल्हाच्यावतीने मानपत्र देवुन सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

ना.बाळासाहेब थोरात यांनी अनावरण केलेल्या मानपत्राव्दारे डॅाक्टरांचा चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते सन्मान !
Chetan Singh Pawar felicitates doctors with honorarium unveiled by Balasaheb Thorat
ना.बाळासाहेब थोरात यांनी अनावरण केलेल्या मानपत्राव्दारे डॅाक्टरांचा चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते सन्मान !

ना.बाळासाहेब थोरात यांनी अनावरण केलेल्या मानपत्राव्दारे डॅाक्टरांचा चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते सन्मान !

मुरबाड तालुक्यात दि.१६ व १७ ॲाक्टोबंर २०२० रोजी मुरबाड शहर व तालुका तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील खाजगी व शासकीय डॅाक्टर यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल आद.राहुलजी गांधी विचारमंच, ठाणे जिल्हाच्यावतीने मानपत्र देवुन सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील मानपत्राचे अनावरण मागील आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात व महानंदाचे चेअरमन ना. रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तर डॅाक्टरांचा सन्मान  विचारमंचचे अध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस(पर्या विभाग) चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते तर जिल्हाध्यक्ष धनाजी बांगर, तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, शहरअध्यक्ष गणेश खारे, अमोल सुरोशी, सुनिल साबळे, अमोल चौधरी, नेताजी लाटे, दिपक चिडा तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला.

कोरोना महामारीच्या काळामध्ये रुग्णसेवा देवुन हजारोंचे जीव वाचविण्याचे काम खाजगी-शासकीय डॅाक्टरांनी केले तसेच पुढील काळामध्ये संकटांच्या काळामध्ये अश्या पध्दतीने रुग्णसेवा करावी ह्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणुन सदरील कार्यक्रम ठेवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले तसेच डॅाक्टरांच्या समस्या देखील समजुन घेतल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.ग्रामीण भागामध्ये मुरबाड-कल्याण तालुक्यातील सरकारी कोविड सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कोविड सेंटर, खाजगी क्लिनिक, हॅास्पिटल आदी मधील जवळपास १०० डॅाक्टरांचा सत्कार केल्याचे जिल्हाध्यक्ष धनाजी बांगर यांनी सांगितले. आमच्या सेवेची दखल घेतल्याबद्दल गोवेली ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कऊटकर, मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथील डॅा. विक्रांत गुजर व खाजगी डॉक्टरांच्यावतीने धसई येथील डॅा. अतुल चौधरी यांनी राहुल गांधी विचारमंचचे आभार मानले.

मुरबाड

प्रतिनिधी -लक्ष्मण पवार

____________

Also see :दुर्गाडीचे दुर्गा देवीचे मंदिर नवरात्रीत भाविकांसाठी राहणार बंद

https://www.theganimikava.com/The-temple-of-Goddess-Durga-will-be-closed-for-devotees-on-Navratri