जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, 4 मृत्यू, 40 बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 40 जण बेपत्ता झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, 4 मृत्यू, 40 बेपत्ता
Cloudburst in jammu kashmir

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, 4 मृत्यू, 40 बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 40 जण बेपत्ता झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 40 जण बेपत्ता झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे 5 ते 8 घरांसह रेशन दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे.(Cloudburst in Jammu and Kashmir, 4 dead, 40 missing)

 

देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जम्मू-काश्मीरपासून 200 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किश्तवाडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या ठिकाणी मदतीसाठी लष्कर आणि पोलिसांची एक टीम पाठवण्यात आल्याचं किश्तवाडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार शर्मा यांनी सांगितलं.गेल्या काही दिवसांपासून जम्मूच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे.


जुलै अखेरपर्यंत हा पाऊस सुरू राहणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. किश्तवाडमधील अधिकाऱ्यांनी नदी, तलाव आणि दरड कोसळण्याच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसात प्रचंड पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाण्याची पातळी वाढू शकते. जम्मू-काश्मीरपाठोपाठ हिमाचल प्रदेशातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात पूर आला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक बेपत्ता आहेत. हिमाचलच्या लाहौलमध्ये ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आहे.(Cloudburst in Jammu and Kashmir, 4 dead, 40 missing)

त्यामुळे एकजण बेपत्ता झाला आहे. तर चंबा येथे पुरामुळे एक व्यक्ती बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.