दि ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे सफाळे शाखेचे उद्घाटन

पालघर तालुक्यातील सफाळे येथे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सफाळे शाखेचे उद्घाटन दि.२० रोजी संचालक आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दि ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे सफाळे शाखेचे  उद्घाटन
Co operative Central Bank

दि ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे सफाळे शाखेचे  उद्घाटन

पालघर तालुक्यातील सफाळे येथे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड  सफाळे शाखेचे उद्घाटन दि.२० रोजी संचालक आमदार राजेश पाटील  यांच्या हस्ते  करण्यात आले. 

रविंद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यातील सफाळे येथे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड  सफाळे शाखेचे उद्घाटन दि.२० रोजी संचालक आमदार राजेश पाटील  यांच्या हस्ते  करण्यात आले. सदरच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष राजेंद्र पाटील,  उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक व आमदार राजेश पाटील, भाऊ कु-हाडे ,  बाबाजी पाटील, राजेश पाटील, लक्ष्मण ठोंबरे, बाबुराव दिघा, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे बँक व्यवस्थापक नरोत्तम पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले.(Co operative Central Bank)

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी सफाळे येथील शाखा ६ फेब्रुवारी १९६८ रोजी जुन्या सफाळे ग्रामपंचायत इमारतीत शाखा सुरू करण्यात आली होती. गेली ५४ वर्ष या इमारतीत दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक चे कामकाज चालत होते. हि इमारत जीर्ण  झाल्याने शेवटची घटका मोजत होती. अशा परिस्थितीत सफाळे पोलीस ठाण्याच्या बाजुला असलेल्या वसंत  विहार या नवीन इमारतीत कामकाज सुरू करण्यात आले आहे. यावेळी सरपंच अमोद जाधव , उपसरपंच राजेश म्हात्रे ,नागेश पाटील उपस्थित होते.(Co operative Central Bank)