संविधान दिनानिमित्त वाड्यात रेखाटली संविधानिक अधिकारांची रांगोळी

संविधान दिनानिमित्त वाड्यात भारतीय बौद्ध महासभा संविधान सन्मान रॅली सकाळी ११ वाजता काढण्यात आली . ही रॅली पी . जे . हायस्कूल वाडा पटांगण ते संपूर्ण वाडा फिरत शेवटी पठारे मंगल कार्यालय येथे बुद्ध विचार आणि आपल्या जीवनामध्ये संविधानाचे असणारे महत्व हे समजून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संविधान दिनानिमित्त वाड्यात रेखाटली संविधानिक अधिकारांची  रांगोळी
Constitution Day

रविंद्र घरत:

 संविधान दिनानिमित्त वाड्यात भारतीय बौद्ध महासभा संविधान सन्मान रॅली सकाळी ११ वाजता काढण्यात आली . ही रॅली पी . जे . हायस्कूल वाडा पटांगण ते संपूर्ण वाडा फिरत शेवटी पठारे मंगल कार्यालय येथे बुद्ध विचार आणि आपल्या जीवनामध्ये संविधानाचे असणारे महत्व हे समजून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . " भारतीय संविधानातील खास वैशिष्ट्य ” हा विषय मांडण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून एम . डी . सरोदे गुरुजी राष्ट्रीय सचिव तथा हरियाना व राजस्थान ( पालकमंत्री ) उपस्थित होते . त्याचबरोबर कानन पाटील या महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीने संविधान दिनानिमित्त संविधानिक मूळ उद्देशांचा जागर व्हावा या निर्मळ हेतूने आकर्षक रांगोळी रेखाटली आहे.(Constitution Day)

सध्याच्या निव्वळ राजकारणाच्या वाऱ्यामध्ये संविधान हे गरिबांसाठी सुद्धा आहे , संविधानाने जे अधिकार श्रीमंतांना दिलेत तेच अधिकार भारताच्या सगळ्यांत गरीब जनतेला देखील दिले आहेत . हे देशातील सर्वसामान्य जनता समजून घेत नाही . सगळ्याच स्थरावर मतभेद , जातीभेद , दुय्यम वागणूक दिली जाते . भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता या शब्दांचा समावेश आहे . पण हे शब्द आपल्या जीवनात आहेत , की आपले आयुष्यच या शब्दांत सामावले आहे ! याचा अभ्यास करणे काळाची गरज आहे.

संविधानाने भारत वासियांना कोणते अधिकार दिलेत आणि त्या अधिकारांचा आपल्या जीव किती महत्व आहे , हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं . अभ्यास मंडळांनी फक्त उद्देशिकेत समाविष्ट असणाऱ्या घटकांचा परिपूर्ण अर्थ आपल्या पुस्तकांत दिला तर आम्ही ' भारताचे लोक ' या शब्दांचा अर्थ बाबासाहेबांचा भारत घडवेल . काननने रेखाटलेल्या या रांगोळीच सर्वत्र कौतुक होत आहे.(Constitution Day)