डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने संविधान तयार झाले आहे- न्यायाधीश खाजा फारूकु अहमद

संविधान दिना निमित्त न्यायधीश डाॅ.खाजा फारुख अहमद यांचे बीडकरांना संविधानाचे महत्त्व सांगणारे वैचारिक मार्गदर्शन लाभले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  अथक परिश्रमाने संविधान  तयार  झाले आहे- न्यायाधीश खाजा फारूकु अहमद
Constitution Day

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 बीड दि.26 संविधान  दिना निमित्त न्यायधीश डाॅ.खाजा फारुख अहमद यांचे बीडकरांना संविधानाचे महत्त्व सांगणारे वैचारिक मार्गदर्शन लाभले आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लाॅयर्स  सोशल फोरम यांच्या वतीने डाॅ. खाजा फारुख अहमद  जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांचे जाहीर व्याख्यान सामाजिक न्याय भवन बीड येथे झाले आहे. या वेळी न्यायधीश साहेब म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमानंतर भारतातील वंचित व बहुजन वर्गाला अधिकार देणारे सर्वाच्च अशा संविधानाच्या कलमात त्यांचे अधिकार संरक्षित करण्यात आले आहेत.(Constitution Day)

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अँड कृष्णा पंडित हे बीड चे ज्येष्ठ विधीज्ञ होते ते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त जाती धर्माला न्याय व सन्मान देणारे संविधान अथक परिश्रमानंतर या देशाला दिले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. चंद्रमणी वीर असे म्हणाले की संविधानाची अंमलबजावणी पुर्णपणे झाली तर भारत सुजलाम सुफलाम होईल. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अँड. पंकज कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अँड. सुनील वडमारे, अँड. लहु गंगावणे, अँड. श्रीकांत साबळे, अँड. लहु गंगावणे, तसेच सर्व लॉयरस फोरम चे पदाधीकारी व यांनी परिक्षरम घेतले  आहेत.(Constitution Day)