नागसेन बुद्धविहारात झाला संविधान दिन साजरा

बीड नागसेन बुद्धविहार पालवण चौक धानोरा रोड बीड येथे २६नोव्हेबर हा संविधान दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

नागसेन बुद्धविहारात झाला संविधान दिन साजरा
Constitution Day

नागसेन बुद्धविहारात झाला संविधान दिन साजरा

बीड  नागसेन बुद्धविहार पालवण चौक धानोरा रोड बीड येथे २६नोव्हेबर हा संविधान दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  नागसेन बुद्धविहार पालवण चौक धानोरा रोड बीड येथे २६नोव्हेबर हा संविधान दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अँड.कल्याणजी गाडे साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी न्यायमुर्ती अँड सुषिमजी वडमारे साहेब, अँड जगताप साहेब व नगरसेवक गणेशजी वाघमारे साहेब हे लाभले अध्यक्ष ,प्रमुख पाहुण्यांच्या निवडीसाठी प्रा.आश्रुबा शिंदे सरांनी अनुमोदन दिले.सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांचा  शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व संविधान पुस्तिका देऊन संयोजन समिती तर्फे सत्कार करण्यात आला.(Constitution Day)


सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले,त्या नंतर बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचुन करण्यात आली.माजी न्यायमूर्ती सुषिमजी वडमारे साहेब यांच्या हस्ते ४३विद्यार्थ्यांना संविधान पुस्तिका,एक वही,पेन देऊन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्रा.सिरसट सरांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तर आपल्या मनोगतात  प्रा.गाडे सरांनी संविधान चे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुणगान गायले.प्रमुख पाहुणे मा.न्यायमुर्ती वडमारे साहेबांनी राज्य घटने तील अधिकाराने  व शिक्षणाच्या खुल्या दाराने विद्यार्थी,समाज व देश कसा घडतो याचे अनमोल मार्गदर्शन केले.

तर अँड जगताप साहेबांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणा दिली.शेवटी अध्यक्षिय भाषणात अँड कल्याणजी  गाडे सरांनी घटनेतील समानता पटवुन दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब ओव्हाळ सरांनी केले तर आभार प्रदर्शन उमाजी वाघमारे यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमास नागसेन बुद्धविहार संयोजन समिती व प्रा.टि.जी.कांबळे सर,माणिक घाडगे साहेब,मारोती सुरवसे साहेब, सुधाकर वाघमारे सर, राणोजी निकाळजे साहेब,श्रीमंत उजगरे साहेब,मधुकर गायकवाड साहेब,जालिंदर साखरे सर,प्रा.अशोक गायकवाड सर.,योगेश जावळे सर,गौतम सिरसाठ सर, डॉ.ताकपिरे सर,भास्कर मुंडे सर प्रा.अवचार सर.आश्रुबा गायकवाड सर, कुंडलिक सातपुते साहेब,दादा उजगरे साहेब,बंटी धुतडमल,राहुल वडमारे ,संतोष धन्वे,ज्ञानोबा पोटभरे मामा,राम गायकवाड साहेब,पंडित साहेब,लखन जोगदंड,अजय गालफाडे,विलास चक्रे साहेब,साळवे मामा, केशरबाई कांबळे सुशिला गायकवाड ताई.वाघमारे ताई,सविताओव्हाळ ,जानका डोंगरे, प्रा राणी जाधव,जावळे ताई विश्वमाला इनकर,वर्षा अवचार,प्रिती वाघमारे,छाया धन्वे, डॉ ‌ताकपिरे,वडमारे ताई,गाडे ताई, निर्मला धन्वे,चक्रे ताई असे परिसरातील अनेक उपासक उपासिका या कार्यक्रमास उपस्थित होत.(Constitution Day)