अजित सिंह राजकारणात कसे आले ?

अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. अजित सिंह चौधरी हे देशाचे माझी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे पूत्र होते. 

अजित सिंह राजकारणात कसे आले ?
Corona Death

अजित सिंह राजकारणात कसे आले ?

How did Ajit Singh get into politics ?

अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. अजित सिंह चौधरी हे देशाचे माझी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे पूत्र होते. 

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह  यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. अजित सिंह चौधरी हे देशाचे माझी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे पूत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

चौधरी अजित सिंह यांनी 1997 साली काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रीय लोकदलाची  स्थापना केली होती. मेरठच्या भडोला गावात 12 फेब्रुवारी 1939 रोजी त्यांचा जन्म झाला होता. लखनऊमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी संस्थेत दाखल झाले.

आयआयटीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर अजित सिंह यांनी अमेरिकेच्या इलिनाइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर तब्बल 17 वर्षे अजित सिंह अमेरिकेत नोकरी करत होते. 1960 मध्ये आयबीएममध्ये काम करणाऱ्या मोजक्या भारतीयांमध्ये अजित सिंह यांचा समावेश होता.

1980 साली अजित सिंह यांचे वडील चरणसिंह यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. त्यानंतर अजित सिंह 1986 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. 1989 आणि 91 साली ते लोकसभेवर निवडून गेले. तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारमध्ये ते 11 महिने उद्योगमंत्री राहिले.

अजित सिंह यांनी 1997 साली राष्ट्रीय लोकदलाची स्थापना केली. मात्र, त्यानंतर 1998 साली बागपत मतदारसंघातून त्यांना भाजपच्या सोमपाल शास्त्री यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 या तिन्ही वेळेस ते लोकसभेवर निवडून गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्येही ते केंद्रीय मंत्री होते.

 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित सिंह यांच्या कारकीर्दीली उतरती कळा लागली. 2019 च्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नुकत्याच झालेल्या कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकदलाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रीय लोकदल उभारी घेणार असल्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. 

अजित सिंह चौधरी हे देशाचे माझी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे पूत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाबद्दल रालोद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.