17 दिवसात चौघांचा अंत

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेला.

17 दिवसात चौघांचा अंत
Corona Death

17 दिवसात चौघांचा अंत

The end of  Family in 17 days

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेला.

कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अवघ्या सतरा दिवसात अंत झाला. पाच-पाच दिवसांच्या अंतराने येवले कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. येवलेंच्या घराजवळील काही शेजारी कुटुंबांनी कोरोनाच्या धास्तीने थेट जंगलातच संसार थाटला आहे.

कोरोनाचा कहर काही केल्या थांबता थांबेनासा झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा यात समावेश आहे. आधी आई-वडिलांवर काळाने घाला घातला, त्यानंतर धाकटा भाऊ गेला. तर अखेर मोठ्या भावाचाही जळगावच्या कोविड सेंटर  रुग्णालयात मृत्यू झाला.

काकोडा गावातील अहिल्याबाई होळकर नगरातील रत्नमाला येवले यांचा दिनांक 17 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती रमेश येवले यांचीही प्राणज्योत मालवली. आई वडिलांची चितेची आग शांत होत नाही, तोवर दोन्ही मुलांचाही दुर्दैवी अंत झाला. 

दोन्ही मुलांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहेत. एका भावाला दोन मुले आणि एक मुलगी, तर दुसऱ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी. घरची जबाबदारी आता या दोन्ही महिलांवर आली आहे. मात्र या कोरोनाचा काळात दोन्ही महिला आपापल्या माहेरी मुलाबाळांना घेऊन निघून गेल्या आहेत. 

कोरोनाच्या संकटकाळात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांवर काळाने घाला घालण्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. उस्मानाबाद येथील बेदमुथा कुटुंबातील दोघा भावांचा अवघ्या 8 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्गानंतर हैद्राबादमध्ये उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. दोघंही भाऊ पेशाने पत्रकार होते.

कोरोनाने पुण्यात अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

एक मुलगा गाव खेड्यांमध्ये गोळ्या बिस्कीट विकत होता तर दुसरा मातकामाला जात होता. मेहनतीच्या बळावर यांनी कुटुंबाच्या विकासासाठी स्वप्न पाहिले होते, मात्र ही स्वप्नं त्यांच्या निधनाने विरुन गेली.