तिसरी लाट भयंकर असणार, महाविकास आघाडी तुमच्यासोबत

कोरोनाची तिसरी लाट भयंकर असणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काळजी घ्या. या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे.

तिसरी लाट भयंकर असणार, महाविकास आघाडी तुमच्यासोबत
Corona Third Wave

तिसरी लाट भयंकर असणार, महाविकास आघाडी तुमच्यासोबत

कोरोनाची तिसरी लाट भयंकर असणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काळजी घ्या. या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे.

कोरोनाची तिसरी लाट भयंकर असणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काळजी घ्या. या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.नागपूर येथे ध्वजारोहण समारंभ प्रसंगी नितीन राऊत बोलत होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. अनेकांना आपले नातेवाईक गमवावे लागले. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.(Corona Third Wave)

आता आव्हान तिसऱ्या लाटेचं आहे. ही लाट भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे. या लाटेला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ऑक्सिजनची तयारी ठेवली आहे, असं राऊत यांनी सांगितलं.दुसऱ्या लाटेत अनेक समस्या आल्या. रेमडिसिव्हीरचा काळाबाजार सुद्धा झाला. काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आल्या. काही गाव कोरोना मुक्त झाले. त्यांचे अभिनंदन. कोरोना काळात शिवभोजनचाही चांगाल फायदा झाला. एकीकडे कोव्हिडचा लढा आणि दुसरीकडे विकास कामं सुद्धा सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं.विदर्भात वाघ वाढत आहेत. त्यांचं संगोपन आम्ही करतो आहोत. शेतकऱ्यांना मदत करणे, सिंचन वाढविणे आवश्यक आहे.

 त्यानुसार प्रयत्न सुरू आहे. आज पासून ई-पीक पाहणी APP सुरू होत आहे. त्याचा फायदा शेतकरी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मंत्रालयासमोर ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटापासून सावध राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय.आरोग्य सुविधा आपण वाढवतोय.शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत.ज्यावेळी असं लक्षात येईल.(Corona Third Wave)

ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.