मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून पालघरकरता दोन लाख कोविशिल्ड लसमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून पालघरकरता दोन लाख कोविशिल्ड लस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून पालघर जिल्ह्याला तब्बल दोन लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून पालघरकरता दोन लाख कोविशिल्ड लसमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून पालघरकरता दोन लाख कोविशिल्ड लस
Corona Vaccination

रवींद्र घरत पालघर:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून पालघर जिल्ह्याला तब्बल दोन लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाल्या आहेत. यामुळे बुधवार, ०९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा लसीकरणाचा विक्रम प्रस्थापित करणार आहे. 

यातील एक लाख लस या वसई-विरार महापालिका क्षेत्रात; तर अन्य एक लाख लस उर्वरित जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहेत.

पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित साहेब यांनी या करीता विशेष प्रयत्न केले होते. खासदार साहेब यांनी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया, केंद्रीय राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारतीताई पवार व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांची भेट घेतली होती. 

या भेटीत ख़ासदार राजेंद्र गावित साहेब यांनी पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करता यावे, याकरता जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

खासदार गावित साहेब यांच्या मागणीचा आदर करताना केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला भरघोस मदत करण्यात आली आहे. या पैकी तब्बल दोन लाख लस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पालघर जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्या आहेत.

या मोहिमेतून पालघर जिल्ह्यात उद्या लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे.