पाच दिवस चालणाऱ्या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा - अमर नाईकवाडे

लसीकरण आपल्या दारी मोहिमेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक ०३ मध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

पाच दिवस चालणाऱ्या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा - अमर नाईकवाडे
Corona Vaccination Camp

पाच दिवस चालणाऱ्या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा - अमर नाईकवाडे

लसीकरण आपल्या दारी मोहिमेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक ०३ मध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड दि .16 लसीकरण आपल्या दारी मोहिमेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक ०३ मध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी स्थानिक भागातील नागरिकांना पुढील पाच दिवस म्हणजे १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत कोविशिल्ड कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. काल जुना मोंढा रोड येथील भीमनगर बुद्धविहारात शिबिराचा पहिला दिवस होता. यावेळी लसीकरण शिबिरात महिलांसह वयोवृध्द संख्या प्रेक्षणीय होती.
या शिबिरात नागरीक पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस घेऊ शकतात. आरोग्य विभागाच्या वतीने वर्षा जाधव, सुमित्रा भावे, सुनीता धूर्वे यांनी काम पाहिले.(Corona Vaccination Camp)

यावेळी भैय्या पवळे, शेख कलीम, शेख ताहेर ,शेख सलमान,सिद्धार्थ पवळे,दादा हिरवे, दीपक जावळे,राजू पवळे, राकेश धनवे, जितेंद्र धनवे,भैय्या आरखडे,अनिल वाघमारे, काशिनाथ साबळे यांचे सहकार्य लाभले.(Corona Vaccination Camp)

प्रभाग क्रमांक ०३ मध्ये खालील ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


दि. 17/11/2021(बुधवार)
स्थळ-गणपती मंदिर विप्रनगर(ब्राह्मणवाडी)

दि.18/11/2021(गुरुवार)
स्थळ- गणपती मंदिर शुक्रवार पेठ, बीड 

दि.19/11/2021 (शुक्रवार)
स्थळ- मेहेर बाबा मंदिर सभाग्रह रामतीर्थ, बीड

दि. 20/11/2021 (शनिवार)
स्थळ-हनुमान मंदिर, हनुमान नगर, बीड