कुदळवाडी परिसरातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी जवळपास लसीकरण केंद्र नाही.

महापालिका शाळा क्रमांक 89 येथे या मुलांचे लसीकरण करण्याची परवानगी द्यावी, अशी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी मागणी केली आहे.

कुदळवाडी परिसरातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी जवळपास लसीकरण केंद्र नाही.
Corona vaccination

 कुदळवाडी परिसरातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी जवळपास लसीकरण केंद्र नाही

महापालिका शाळा क्रमांक 89 येथे या मुलांचे लसीकरण करण्याची परवानगी द्यावी, अशी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी मागणी केली आहे.

पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सरोदे:

 कुदळवाडी परिसरातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी जवळपास लसीकरण केंद्र नाही. त्यामुळे महापालिका शाळा क्रमांक 89 येथे या मुलांचे लसीकरण करण्याची परवानगी द्यावी, अशी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी मागणी केली आहे. याबाबत यादव यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 48 हजार पेक्षा अधिक मुलांचे लसीकरण झाले आहे. कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. सध्या येथील 15 ते 18 वयोगटातील युवक व युवतींना लस घेण्यासाठी जवळ सोय नाही. त्यामुळे महापालिकेच्या वतीने कुदळवाडी भागातील शाळा क्रमांक 89 मध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे. यामुळे परिसरातील नागरिकांची व युवकांची होणारी गैरसोय थांबेल. तसेच लसीकरणाला गती मिळेल, असे दिनेश यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.