सफाळे लसीकरण केंद्रावर दोनशे लसींकरिता पाचशेच्यावर महिलांची गर्दी, लस वाढवण्याची मागणी

पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाने रक्षाबंधन निमित्ताने महिलांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम हाती घेण्यात आल्याने त्याचा पुर्णत: फज्जा उडालेला दिसून येत आहे.

सफाळे लसीकरण केंद्रावर दोनशे लसींकरिता पाचशेच्यावर महिलांची गर्दी, लस वाढवण्याची मागणी
Corona vaccination

पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाने रक्षाबंधन निमित्ताने महिलांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम हाती घेण्यात आल्याने त्याचा पुर्णत: फज्जा उडालेला  दिसून येत आहे.पालघर  तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत चंद्रप्रभा चित्तरंजन श्राफ  इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  लसीकरण केंद्रावर दोनशे लस उपलब्ध असताना  पाचशेच्या वर महिलांनी गर्दी केल्याने काही महिलांना परत जावे लागले आहे.(Corona vaccination)

शनिवारी २१ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात महिलांसाठी रक्षाबंधन निमित्ताने विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या लसीकरण केंद्रावर सर्व 18 वर्षावरील महिलांसाठी पहिला व दुसरा डोस देण्यात आला असल्याने तरुणींनी व महिलांनी  मोठी गर्दी केली होती. यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री पासून  महिलांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी सकाळच्या सुमारास या महिला भर पावसात छत्री पकडून रांगेमध्ये उभ्या होत्या. या रांगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेटच्या बाहेर रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. या रांगा कोरोनाच्या भितीपोटी नसुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी  रांगा लावून लसीचे दोन डोस पूर्ण करून रेल्वेचा पाच मिळून कामावर जाण्याची ही सगळी धडपड आहे.

सफाळे परिसरात ९०० डोस उपलब्ध असुन विराथन खुर्द २०० डोस, विराथन बुद्रुक २००, वाढीव ३०० डोस तर सफाळे लोकसंख्येच्या दृष्टीने अवघे दोनशे डोस  दिल्याने मोठया प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास २०० टोकण वाटण्यात आले. त्यामुळे काही महिलांची गैरसोय होऊन  टोकण न मिळाल्याने डोस न घेता परत जावे लागले.(Corona vaccination)

त्यामुळे सफाळे  लोकसंख्येच्या दृष्टीने लस वाढवण्याची मागणी महिलांनी केली आहे.

पालघर प्रतिनिधी

रवींद्र घरत