सफाळे ग्रामसेवालयात २३० बालकांचे लसीकरण

पालघर तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ग्रामसेवालया १५ ते १८ वयोगटातील तरुणांना ४०० कोव्हॅक्सिंन लसीचे डोस उपलब्ध झाले होते.

सफाळे ग्रामसेवालयात २३० बालकांचे लसीकरण
Corona vaccination News

सफाळे ग्रामसेवालयात २३० बालकांचे लसीकरण

पालघर तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ग्रामसेवालया १५ ते १८ वयोगटातील तरुणांना  ४०० कोव्हॅक्सिंन लसीचे डोस  उपलब्ध झाले होते.

रविंद्र घरत पालघर:

तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ग्रामसेवालया १५ ते १८ वयोगटातील तरुणांना  ४०० कोव्हॅक्सिंन लसीचे डोस  उपलब्ध झाले होते. त्यातील सोमवारी २३० युवक युवतीना लसीचे डोस देऊन शुभारंभ करण्यात आला.सफाळे ग्रामसेवालयात माजी सरपंच अमोद जाधव व प्रशांत किणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी ग्रामसेवालय सफाळे येथे श्रेया अविनाश पिंपळे या विद्यार्थिनीला कोव्हॅक्सिंगचा पहिला डोस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. सफाळे  परिसरातील पालक आपल्या मुलांना लस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.   प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी  सोशल डिस्टनचे पालन करून खबरदारी घेण्यात आली.(Corona vaccination News)


     लसीकरण सुरू होण्यापूर्वी  विद्यार्थ्यांना व पालकांना लसीचे महत्त्व पटवून देण्यात आले. लसीकरणा च्या पहिल्या दिवशी २३० युवक-युवतींनी  पहिला डोस देऊन लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यातील उरलेल्या पैकी  ९९   डोस मंगळवारी लालठाणे  येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद रणदिवे, आरोग्य सहाय्यक मनोज पिंपळे, महिला कर्मचारी, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.(Corona vaccination News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/