१५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ सम्पन्न, जिल्ह्यातील १,६८,९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट

सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपुर या पंधरा वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीस लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

१५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ सम्पन्न, जिल्ह्यातील १,६८,९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट
Corona vaccination Updates

१५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ सम्पन्न, जिल्ह्यातील १,६८,९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट

सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपुर या पंधरा वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीस लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. 

रविंद्र घरत पालघर:

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास आज पासून सुरुवात झाली असून चहाडे येथील स्वर्गीय श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ,  उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पालघर पं.स.सभापती रंजना म्हसकर, जि.प.सदस्य नीता पाटील, जिल्हा पेईन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.(Corona vaccination Updates)


सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपुर या पंधरा वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीस लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयापासून लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील एकूण १,६८,९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी डॉ.अभिजित खंदारे यांनी दिली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी हा शुभारंभ होत असून ही आनंदाची गोष्ट आहे आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्या मुळे ही मोहीम यशस्वी होईल असे मत यावेळी अध्यक्ष वाढाण यांनी व्यक्त केले.तसेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे असून लसीकरणाबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नका असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून कोरोना ची तिसरी लाट आपण थोपवू शकतो असा विश्वास व्यक्त करून रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळा आणि कुठल्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे  आवाहन वैदेही वाढाण यांनी केले.

लहानपणी जे लसीकरण झालं आहे त्याचाच हा भाग असून आता कोव्हिडं च्या पार्श्वभूमीवर ही लस देण्यात येणार आहे त्यामुळे मुलांनी घाबरून जाण्याचे कारणं नाही असे प्रतिपादन यावेळी मु.का.अ.यांनी केले.यानंतर मासवण प्राथमिक आरोग्य  केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशा सूचना अध्यक्ष वाढाण यांनी केल्या.
यावेळी चहाडे ग्रामपंचायतिच्या सरपंच, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिकारी,  शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , आशा ,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.(Corona vaccination Updates)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/