चार तालुक्यात शाळा सुरू करण्याबाबत मतभेद

साताऱ्यात ७५ टक्के करोना बाधित फक्त चार तालुक्यात आहेत. कराड, सातारा,फलटण, खटाव या तालुक्यात करोनाचे वाढते आव्हान आहे.

चार तालुक्यात शाळा सुरू करण्याबाबत मतभेद
Coronavirus Updates

चार तालुक्यात शाळा सुरू करण्याबाबत मतभेद

साताऱ्यात ७५ टक्के करोना बाधित फक्त चार तालुक्यात आहेत. कराड, सातारा,फलटण, खटाव या तालुक्यात करोनाचे वाढते आव्हान आहे. 

मागील २४ तासात ६२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १७ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात एकमत नाही.शाळांबाबत पालकांत विविध मतमतांतरे आहेत.साताऱ्यात करोना रुग्णवाढीचा आलेख कायम असून राज्यातील निर्बंध असलेल्या दहा जिल्ह्यात अजूनही साताऱ्याचा  समावेश आहे.(Coronavirus Updates)

जिल्ह्यात रुग्णवाढ अचानक उसळी घेत असली तरी कराड, सातारा, फलटण,खटाव या तालुक्यात  एकूण रुग्ण ७५ टक्के असल्याचे आकडेवाडीवरून दिसते. कराड, सातारा तालुक्यातील आकडेवारी कायमच फुगलेली असून गेल्या महिन्यात फलटण, खटाव, कोरेगांव या तालुक्यातील वाढ कमी झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात या तालुक्यातही रुग्णवाढीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे रुग्णवाढ कमी करण्याचे आव्हान आहे.

दरम्यान बुधवारी जिल्ह्यात ६२२ रुग्णांची नव्याने भर पडली असून १२ हजार १४ संशयितांच्या चाचण्या केल्या आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्याचा बाधित दर ५.१७ टक्के आहे.साताऱ्यात कराड तालुक्यातील रुग्णवाढ  कमी करण्यात अजपर्यंत एकदाही यश आलेले नाही. मंगळवारी आलेल्या अहवालात कराड १६२ खटाव १३१, फलटण १४१, सातारा १४१ अशी रुग्णवाढ झाली आहे.

इतर तालुक्यात रुग्णवाढ कमी झाली असली तरी ती कायमस्वरूपी नियंत्रणातच राहिल असे नियम राबवायला हवेत.राज्यातील करोना रुग्ण नियंत्रणात आलेल्या २६ जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील दहा जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.

यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णवाढीची स्थिती पाहता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष आहे.कराडसारख्या तालुक्यात रुग्णवाढीवर नियंत्रण आणणे आव्हानात्मक बनले असताना शाळा सुरू झाल्यावर पाल्यांबाबत काय निर्णय घ्यायचा या संभ्रमात पालक आहेत. कारण यापूर्वी शाळा सुरू झाल्या होत्या मात्र मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी बाधित आढळल्याने शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या.(Coronavirus Updates)

त्यामुळे सर्वसमावेशक परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत.