कोरोना योद्धा सहा महिन्या पासून स्वयंस्फूर्तीने सेवाधर्म करणारा खंडु जाधव
कोरोनाचा दुसऱ्या लाटे पासून आजतागायत शिरूर तालुक्यातील पाडळी गावचे माझी कार्यकर्ते खंडू नाना जाधव गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत.

कोरोना योद्धा सहा महिन्या पासून स्वयंस्फूर्तीने सेवाधर्म करणारा खंडु जाधव
कोरोनाचा दुसऱ्या लाटे पासून आजतागायत शिरूर तालुक्यातील पाडळी गावचे माझी कार्यकर्ते खंडू नाना जाधव गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत.
दि.३१ गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रुग्णांची सेवा करणार सामाजिक कार्यकर्ता खंडू जाधव कोरोनाचा दुसऱ्या लाटे पासून आजतागायत शिरूर तालुक्यातील पाडळी गावचे माझी कार्यकर्ते खंडू नाना जाधव गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत त्यांना ऍडमिट पेपर पासून उपचार सुरू होईपर्यंत बरे झाल्यावर घरी जाई पर्यंत त्यांच्या संपर्कात राहतात व त्यांना धीर देण्याचे काम करतात कोरणा रुग्णांना काही अडचण असल्यास ते सोडवण्याचा प्रयत्न करतात कोणाला कशाची गरज पडली तर खंडू नाना जाधव यांना फोन आला की खंडू नाना जाधव हे पेशंट साठी दवाखान्यात हजर होतात गेल्या सहा महिन्यापासून कित्येक रुग्णांनाचा ते आधार बनले आहे खरच खंडू नाना जाधव हे रुग्णांचा आधार बनले आहेत अनाथ, अपंग, ज्येष्ठ ज्याला कोणी नाही अशांची तर ते ऍडमिट करून सुट्टी होईपर्यंत घरी सोडेपर्यंत देखबाल करतात त्यांना कशाचीही कमतरता भासू देत नाही तसे ते सर्वांचे आधार बनले आहेत.
खंडू नाना जाधव यांचे कोरणा रुग्णाच्या सेवेचे अखंड सहा महिने झाले आहे ते आजही कोरणा रुग्णांला मदत करतात सहा महिन्यांमध्ये कित्येक रुग्णांना त्यांनी एडमिट केलं आणि बरे करून घरी सोडले दवाखान्यामध्ये त्याच्यासाठी ते धावून येत आहेत कोरणा रुग्णाची विचारपूस त्यांना धीर देण्याचे काम करत आहेत कोरोना रुग्णांना आधाराची गरज आहे त्यांना मि आधार देण्याचे काम करतो. मि माझं कर्तव्य समजतो मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे.याप्रमाणे कोरणा रुग्णाची सेवा करत आहे .
त्यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी वरील माहिती दिली पुढे बोलताना त्यांनी सांगितले सर्वांनी मिळून कोरोणाला हरवायला पाहिजे.सर्वांनी नियमाचे पालन केले पाहिजे आपल्याला लक्षणं जाणवले तर तात्काळ कोरोना टेस्ट केली पाहिजे पॉझिटिव्ह आले तर तात्काळ ऍडमिट झालं पाहिजे.
सर्वांनी सुरक्षित एकमेकास पासून अंतर राखले पाहिजे.
माक्सचा वापर केला पाहिजे जोपर्यंत आपण हात स्वच्छ धूत नाहीत तोपर्यंत आपण नाका तोंडाला ला हात लावू नये सर्वांनी याचे पालन केले तर आपण तिसऱ्या लाटेला रोखू शकतो ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत