भविष्यात उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांनी मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात वाव द्यावा- डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर

बीड शहरातील प्रेसिडेंट क्रिकेट अकॅडमीमध्ये अनेक युवा क्रिकेटपटू क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्या युवा क्रिकेटपटू मध्ये अनेक गरीब आणि गरजू खेळाडू आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी साहित्य घेण्याची परिस्थिती नसल्याने अनेक प्रतिभावंत खेळाडू राज्यस्तरावर किंवा देशपातळीवर खेळू शकत नाहीत.

भविष्यात उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांनी मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात वाव द्यावा- डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर
Cricket Academy Beed

भविष्यात उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांनी मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात वाव द्यावा- डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर

 बीड शहरातील प्रेसिडेंट क्रिकेट अकॅडमीमध्ये अनेक युवा क्रिकेटपटू क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्या युवा क्रिकेटपटू मध्ये अनेक गरीब आणि गरजू खेळाडू आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी साहित्य घेण्याची परिस्थिती नसल्याने अनेक प्रतिभावंत खेळाडू राज्यस्तरावर किंवा देशपातळीवर खेळू शकत नाहीत.

बीड जिल्हा प्रति निधी विश्वनाथ शरणांगत:

  बीड शहरातील प्रेसिडेंट क्रिकेट अकॅडमीमध्ये अनेक युवा क्रिकेटपटू क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्या युवा क्रिकेटपटू मध्ये अनेक गरीब आणि गरजू खेळाडू आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी साहित्य घेण्याची परिस्थिती नसल्याने अनेक प्रतिभावंत खेळाडू राज्यस्तरावर किंवा देशपातळीवर खेळू शकत नाहीत. मात्र आपल्या बीड शहरातील प्रतिभावंत खेळाडू साहीत्यामुळे मागे राहू नयेत म्हणून युवा नेते तथा नगरसेवक डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी गरजू युवा खेळाडूंना क्रिकेट चे साहित्य दिले.(Cricket Academy Beed)

मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे प्रेसिडेंट क्रिकेट अकॅडमीस युवा नेते तथा न.प.सदस्य डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी भेट दिली होती. त्यावेळी आढावा घेत असतांना त्यांना खेळाडूंना लागणाऱ्या आवश्यक साहित्याबाबत बाबत उणीवा जाणवल्या होत्या. त्या दूर करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. काल दिलेले आश्वासन पाळत प्रेसिडेंट क्रिकेट अकॅडमीस डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी क्रिकेट साहित्य (किट्स) भेट देवून त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला.


    यावेळी बोलतांना डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर म्हणाले की, भविष्यात उत्तम खेळाडू आपल्याला घडवायचे असतील तर लहानपणापासूनच आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात वाव दिला पाहिजे. त्याला त्या खेळाची कोचिंग लावली पाहिजे. खेळाबरोबरच त्याच्या आहार, आराम याची देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे तरच एक उत्तम खेळाडू घडू शकतो. मी देखील जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे.

त्यामुळे क्रिकेटच्या संबंधित असलेल्या विविध अकॅडमी व खेळाडूंच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. या किट्सच्या माध्यमातून गरजू खेळाडूंना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. आपल्या या प्रेसिडेंट क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच चांगले खेळाडू घडतील व येणाऱ्या काळात देखील आमचे सहकार्य असेल आश्वासन डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी दिले.यावेळी समवेत जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलिम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, हाफीज भाई, हामेद चाऊस, प्रोफेसर मोमीन कलीम, मनोज जोगदंड, प्रोफेसर जावेद पाशा, शेख रफिक, शाहरुख पठाण, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे यांच्यासह युवा खेळाडू उपस्थित होते.(Cricket Academy Beed)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link