विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरी केली दहीहंडी

शालेय विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य व गोर गरीब महिलांनी कपडे वाटप कुडूस ग्रामपंचायत सभागृहात मंगळवार (दि.३१) रोजी आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरी केली दहीहंडी
Dahihandi celebrated

शैक्षणिक शिक्षण वाटप करून साजरी केली दहीहंडी

जयेश घोडविंदे/वाडा:
  वाडा तालुक्यातील कुडुस येथे दरवर्षी महाराष्ट्र कला क्रीडा या संस्थेची मानाची दहीहंडी असते परंतु या वर्षी दहीहंडी चे अवचित्य साधून गोविंद पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य व गोर गरीब महिलांनी कपडे वाटप कुडूस ग्रामपंचायत सभागृहात मंगळवार (दि.३१) रोजी आयोजन केले होते.


      काही काळासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले, हा संदेश जगाला देऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात यंदाही दहीहंडीला परवानगी दिली जाणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय गोविंदा पथके, आयोजकांनी घेतला. 


राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी गोविंदा पथके आणि दहीहंडी आयोजकांनी सरकारकडे केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सोमवारी गोविंदा पथकांशी संवाद साधला.
सणवार, उत्सवाबाबतच्या आपल्या सर्वाच्या भावना सारख्याच आहेत. पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून आपण करोनाविरुद्ध लढत आहोत. त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी, याचाही विचार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी यंदाही दहीहंडीला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.


     या कार्यक्रम प्रसंगी वाडा तालुका पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील यांनी  मार्गदर्शन करत असताना गोविंद पाटील यांचे कार्य खूप चांगले आहे त्यांचे विचार इतरांनी सुद्धा आत्मसात केले पाहिजे मंदिरे उघडण्या पेक्षा विद्येचे मंदिर उघडा मंदिरा पेक्षा विद्यार्थी कसे शिक्षण घेतील या कडे बघा विध्यार्थी हेच आपले उद्याचे भविष्य आहेत असा टोला या वेळी मारला या कार्यक्रमास शिव सेना उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील , मा.उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख उमेश पठारे, नीलेश पाटील, माजी उपसरपंच गिरीष चौधरी, इरफान सुसे, कुडूस शहर प्रमुख प्रकाश शेटे, ग्रामविकास अधिकारी अनिरुध्द पाटील, योगेश भानुशाली, रुक्साद शेख,यांच्या सह आदी मान्यवर उपस्थितीत होते.