शर्मा-मुंडे भांडणात दलित महिला कार्यकर्त्यांचा वापर दुर्दैवी

परळी, अंबाजोगाई, केज, पाटोदा, माजलगाव , धारूर भागात दलित अत्याचार अट्रोसिटी ऍक्टच्या खऱ्या केसेसने धुमाकूळ घातला.

शर्मा-मुंडे भांडणात दलित महिला कार्यकर्त्यांचा वापर दुर्दैवी
Dalit Atrocities Act

शर्मा-मुंडे भांडणात दलित महिला कार्यकर्त्यांचा वापर दुर्दैवी

परळी, अंबाजोगाई, केज, पाटोदा, माजलगाव , धारूर भागात दलित अत्याचार अट्रोसिटी ऍक्टच्या खऱ्या केसेसने धुमाकूळ घातला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


दि.६ परळी, अंबाजोगाई, केज, पाटोदा, माजलगाव , धारूर भागात दलित अत्याचार अट्रोसिटी ऍक्टच्या खऱ्या केसेसने धुमाकूळ घातला. या केसेस दाखल होऊ नये म्हणून अनेक पोलीस स्टेशनने खाजगीत केसेस करू नका म्हणून वरून दबाव असल्याचे सांगितले. आज मात्र अट्रोसिटी ऍक्ट चा वापर तात्काळ "शर्मा" विरोधात करण्यात आला.पोलिसांनी ज्या तत्परतेने गुन्हा दाखल केला एरवी अनेक प्रकरणात पोलिसांनी दलित अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल केलेले नाहीत. पोलिसांना हाताशी धरून केस टाकणे नाही टाकायला भाग पाडणे हीच असते सत्ता यंत्रणेला ती गुलाम करते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने यंत्रणा गुलाम केली आहे ती जनतेसाठी नाही तर घरगुती भांडणात वापरली जाऊ लागली आहे मागासवर्गीय समाजातील पुरुष,महिला,कार्यकर्ते,नेते यांनी आपल्या  नेत्याला वाचवण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे  समाजावर होणाऱ्या अत्याचाराची कवच कुंडल अगदी लाळचाटू पणे वापरून समाजाची बदनामी व दिशाभूल करू नये.(Dalit Atrocities Act)


 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची कथित पत्नी करुणा धनंजय मुंडे यांच्या वादात उडी मारून मागासवर्गीय समाजातील महिला पुरुष कार्यकर्त्यांनी ॲट्रॉसिटी ला बदनाम करून नेत्याच्या नजरेत येण्याचा काम करून समाजाच्या नजरेत खटकू नये.आम्ही या वादाकडे व्यक्तिगत, पारिवारिक वाद म्हणून बघत आहोत परंतु जर यामध्ये अट्रोसिटी ऍक्टला घेऊन दलित कार्यकर्त्यांचा वापर सूडबुद्धीसाठी वापरत असेल तर मात्र आम्हाला भूमिका घ्यावी लागेल परळीच्या वैयक्तिक भांडणामध्ये अट्रॉसीटी अक्टची बदनामी थांबवा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी होणे अपेक्षित  नितीन सोनवणे आल इंडिया पँथर सेना मराठवाडा उपाध्यक्ष यांनी केले आहे.(Dalit Atrocities Act)