जळीतग्रस्त रहीवाश्याणा ६वर्ष झाली तरी  घर नाही,मग २१वर्ष झालेल्यांचे काय? किती ही उपेक्षा व व कधि मिळणार घर

७ डिसेंबर २०१५ रोजी दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी आग लागून सुमारे अडीच हजार झोपड्या राख झाल्या होत्या व हजारो लोक बेघर झाले त्यांना सहा वर्ष झाली तरी अद्यापही घर मिळालेले नाही.

जळीतग्रस्त रहीवाश्याणा ६वर्ष झाली तरी  घर नाही,मग २१वर्ष झालेल्यांचे काय? किती ही उपेक्षा व व कधि मिळणार घर
Damu Nagar Kandivali East Mumbai

जळीतग्रस्त रहीवाश्याणा ६वर्ष झाली तरी  घर नाही,मग २१वर्ष झालेल्यांचे काय? किती ही उपेक्षा व व कधि मिळणार घर

७ डिसेंबर २०१५  रोजी दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी आग लागून सुमारे अडीच हजार झोपड्या राख  झाल्या होत्या व हजारो लोक बेघर झाले त्यांना सहा वर्ष झाली तरी अद्यापही घर मिळालेले नाही.

संजय बोर्डे:

 ७ डिसेंबर २०१५  रोजी दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी आग लागून सुमारे अडीच हजार झोपड्या राख  झाल्या होत्या व हजारो लोक बेघर झाले त्यांना सहा वर्ष झाली तरी अद्यापही घर मिळालेले नाही.२१ वर्षापूर्वी वन विभागाने अतिक्रमणाच्या नावाखाली सुमारे चाळीस हजार लोकांची घरे तोडली होती.२१ वर्षांपासून संजय गांधी उद्यानातील रहीवाश्याच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे ४०ते ५०वर्षाचे संसार एका क्षणात बेचिराख केले गेले यामधे कित्येक जीव गेले, कित्येक पागल झाले देशोधडीला लागले,परंतू अद्याप यांना घर नाही व वन अधिकारी दलाल वनमजुर हें भ्रष्टाचार करून लाखो रुपयाची कमाई करून गब्बर झाले आहेत . परंतु अद्याप कोणालाही घर मिळालेले नाही.(Damu Nagar Kandivali East Mumbai)

 भिमनगर कांदिवली पु मुंबई १०१ येथे २०१५रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आग लागून हजारो परिवार पुन्हा जळून राख झाले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विनोद तावडे यांनी २महिन्याच्या आत घर देण्याची घोषणा केली होती परंतू आजही या लोकांना घरे मिळाली नाहीत .

वनविभागात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहेजो सर्वे झाला त्यामधे खूपच भ्रष्टाचार झाला आहे.यामधे वनविभागाचे अधिकारी १००००ते ४०००० घेवून जांपिंग नंबर टाकत असल्याचे उघड झाले आहे. परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई नाही. अशी छुपी चर्चा चालु आहे व बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत .तसेच ३००पेक्षा जास्त लोकाना वनविभागाच्या आशीर्वादाने नकली पावत्या बनवून देण्यात आलेल्या आहेत. यावर महाराष्ट्र पत्रकारअसोसिएशन, सामजिक कार्यकर्ते यांनी वारंवार तक्रार करून काहीही कारवाई नाही.वनविभागाच्या हद्दीत सर्रास अनधिकृत झोपड्या पक्की बांधकामे होतात यामधे क्रांतिनगर भिमनगर व जानूपाडा हें हिटलिस्टवर आहेत .

तसेच या विभागात राहणाऱ्या  राहणाऱ्या ९०वर्षीय हरीबाई तुकाराम मकरंद कांदिवली वन विभागात  २०००/सालि ७०००/रूपये भरले आहें व त्यांच्याकडे सर्वे कागदपत्रे आहेत .त्या सतत सदनिका साठी वनविभागाकडे चकरा मारत आहेत.  २०१४पासून वनविभागाकडे पाठपुरावा करत आहें व २०१६मधे त्यांचे पेपर पात्र होवून स्कॅनिंग झाले आहेत .दिनांक २९जुलै 2२०१९रोजी अधिकारी दाभोळकर यांनी सर्व पेपर बघून ऑर्डर काढली होती व जि नोटीस प्रकाशित केली त्यावर कोनाचेहि आक्षेप आलेले नाहि परंतू वनविभागाचे अधिकारी दिग्विजय सिंग यांनी मुद्दाम  पुन्हा नोटीस प्रकाशित करून या वयोव्रूध लोकांची अवहेलना चालवली आहें.


मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये , गुप्ता व अनवर अहमद असताना या बाबींचा पाठपुरावा करण्यात आला होता . यास वयाचा व प्रक्रुतीचा विचार करून मान्यता दिली होती .परंतु दुसऱ्यांदा नोटीस प्रकाशित केल्याने ज्यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहि ते सुद्धा या मधे पत्रव्यवहार करून गरीब व वयोवृद्ध लोकाना त्रास देत आहेत तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांचि  चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष बाब म्हनजे ३ वयोवृद्ध लॉटरी धारकापैकी भंगारे यांचे निधन झाले आहें व उरलेले दोन्ही त्या मार्गावर आहेत .आता यावर काय निर्णय होतो हें बघणे गरजेचे आहे

अशाच प्रकारे वनविभागातील साडेतेरा हजार रहिवाशांचे पुनर्वसन रखडले आहे.वन विभागाच्या हद्दीत अनधिकृतपणे डुकरे पाळली जातात गांजा विकला जातो दारू विकली जाते. पाणी चोरी होते वीजचोरी होते परंतु वारंवार तक्रार करूनही वनक्षेत्रपाल तुळशी दिनेश देसले काहीही कारवाई करत नाही. अशाप्रकारे भ्रष्टाचार झाल्यामुळे अधिकाऱ्यांना लाचलुचपत खात्याने अटक सुद्धा केले आहे व काही अधिकारी निलंबित झालेले आहे.(Damu Nagar Kandivali East Mumbai)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link