ठाण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे उत्परिवर्तित रुप डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठाण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव
Delta Plus Patients in Thane

ठाण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे उत्परिवर्तित रुप डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे उत्परिवर्तित रुप डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात यश मिळविल्यानंतर या नव्या संकटाने ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची चिंता वाढवली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात 3 तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढल्याने चिंता वाढली आहे.(Delta Plus Patients in Thane)

25 वर्षाखालील 2 जण तर 56 वर्षाखालील 2 जण कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित झाले आहेत. या मध्ये 2 महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. या रुग्णांवर उपचार करून पाठवण्यात आले आहे. असे असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि सापडलेले डेल्टा प्लसचे बाधित रुग्ण पाहता ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लसबाधित रुग्णांची संख्या आता 21 वरून 45 वर गेली आहे. यात 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितलंय. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये डेल्टा चा व्हेरियंट आढळला आहे.(Delta Plus Patients in Thane)

असे असले तरी घाबरुन न जाता रुग्णालयात योग्य वेळी दाखल होण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.