नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच

राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे.

नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच
Dengue In Nagpur

नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच

राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबवली जात आहे. अनेक ठिकाणी सर्वेक्षण करुन विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.नागपुरात आज डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे 8689 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 383 घरांमध्ये डेंग्यूच्या अळी आढळून आल्या.नागपुरात डेंग्यूचा वाढता कहर पाहता डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे.(Dengue In Nagpur)

 तसेच याबाबत आवश्यक त्या उपाययोजनाही राबवल्या जात आहेत.नागपूर महापालिकेतर्फे डेंग्यू प्रतिबंध मोहीम जोरात सुरु आहे. पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या पथकाद्वारे 8689 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 383 घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय 85 ताप असलेले रुग्ण आढळून आले. तसेच 212 जणांच्या रक्तांच्या नमूण्यांची तपासणी करण्यात आली. तर 27 जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत.या सर्वेक्षणादरम्यान 1784 घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात 133 कुलर्समध्ये डासअळी आढळून आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असताना आता मलेरीयासह डेंग्यूने डोके वर काढले. मलेरीयाने जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहगाव येथील विनायक राऊत वय 32 याचा पहिला मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. जिल्ह्यात कोरोनापेक्षा आता मलेरीयाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तब्बल 193 मलेरियाचे रूग्ण तर डेंग्यूचे 13 रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे.दरम्यान आरोग्य विभागाने आता परीसरात सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. आता नागरिकांकडून आरोग्य शिबीरे लावून रूग्णांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाशिम जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडे जिल्हाभरात 20 रुग्णांची नोंद करण्यात आली. प्रामुख्याने खासगी रुग्णालयात उपचार करण्यावर रुग्णांचा भर आहे. त्यामुळे आरोग्य सेवकांमार्फत शहरात सर्वेक्षण केले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात 3 महिन्यांत 20 रुग्णांची नोंद झाली आहे.असं असली तरी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद अद्याप आरोग्य विभागाकडे नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. तुरळक प्रमाणात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.(Dengue In Nagpur)

त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. डेग्यू नियंत्रणासाठी गावागावात उपाययोजना केल्या जात आहेत.