अमरावतीमध्ये डेंग्यूचे थैमान

जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 437 संशयित व्यक्ती आढळल्या असून सध्या 79 डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे.

अमरावतीमध्ये डेंग्यूचे थैमान
Dengue disease

अमरावतीमध्ये डेंग्यूचे थैमान

जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 437 संशयित व्यक्ती आढळल्या असून सध्या 79 डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मात्र आता येथे अनेक जण तापाने फणफणले असून ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात तूफान गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात डेंगूने धुमाकूळ घातले आहेत.(Dengue disease)

आतापर्यंत येथे 437 संशयित व्यक्ती आढळल्या असून सध्या 79 डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे.सध्या कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. लाट ओसरल्यामुळे येथी नागरिक थोडे स्थिरावले होते. मात्र, त्यातच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. येथे डेंग्यूचे एकूण 79 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तसेच जिल्ह्यात सध्या 437 जण संशयित आहेत. येथे डोग्यूच नव्हे तर मलेरियानेसुद्धा डोके वर काढले आहे. येथे मलेरियाचे 9 रुग्ण आढळले आहेत.वरील आकडेवारी ही प्रशासकीय आकडेवारी असून खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे 500 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यात महिनाभरात तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यातील डेंग्यूचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने येथे धूर फवारणी सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात तपासणीला सुद्धा वेग आला आहे.

 नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं सांगितलं जातंय. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात दवंडी देऊन घराच्या परिसरात स्वच्छता राखण्याचं तसेच वाढलेले गवत कापण्याचे आवाहन केले जात आहे.(Dengue disease)

तसेच कोठेही पाणी न साचू देण्याचं अवाहनदेखील केलं जात आहे.