मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण

जि.मा.का. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण
Dhananjay Munde News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ  शरणांगत:

 बीड,दि.16 जि.मा.का. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर 2021 रात्री 09:00 वा. सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण. रात्री 12:00 वा. शिवाजीनगर निवासस्थान, पुणे येथे आगमन.(Dhananjay Munde News)

 शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर 2021 मध्यरात्री 00:30 वा.शिवाजीनगर निवासस्थान, पुणे येथून मोटारीने बीड कडे प्रयाण, पहाटे 05:30 वा. शासकीय विश्रामगृह,बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 08:15 वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन-हुतात्म्यांना श्रद्धांजली कार्यक्रम. स्थळ: स्मृती स्तंभ, प्रियदर्शनी उद्यान, बीड. सकाळी 09:00 वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण समारोह स्थळ: पोलिस मुख्यालय मैदान, बीड सकाळी 10:00 वा. जिल्हा परिषद बीड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2021-22 वितरण सोहळा स्थळ: जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथून माजलगाव कडे मोटारीने प्रयाण दुपारी 02:00 वा. पंचायत समिती माजलगाव नुतन प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा स्थळ: पंचायत समिती नुतन इमारत, माजलगाव. सोयीनुसार 'पंढरी निवास' स्थान परळी वैजनाथ कडे मोटारीने प्रयाण, सोयीनुसार 'पंढरी निवासस्थान' परळी वैजनाथ येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दि. 18 सप्टेंबर 2021 व  रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021 परळी वैजनाथ येथे राखीव.(Dhananjay Munde News)