परळी नगर परिषदेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू - ना. धनंजय मुंडे

परळी नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतून 1927 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, यासाठी 30 कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे.

परळी नगर परिषदेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू - ना. धनंजय मुंडे
Dhananjay Munde News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी दि. 18: परळी नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतून 1927 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, यासाठी 30 कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. यांपैकी 239 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, परळी शहरातील प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल आदी आवास योजनांमधील पात्र असलेला एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही. प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचे स्वप्न आपण पूर्ण करू असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.(Dhananjay Munde News)

तिसऱ्या डीपीआर मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 100 लाभार्थींना पहिल्या हफत्याच्या 40 हजार रुपये रकमेचे धनादेश ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात ना. मुंडे बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर जि. प. गटनेते अजयजी मुंडे, न.प. गटनते वाल्मिक अण्णा कराड, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपकनाना देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, वैजनाथ सोळंके, सभापती गोविंद मुंडे, किशोर पारधे, अनिल अष्टेकर, अन्वर मिस्किन, नितीन रोडे, केशव गायकवाड, विजय भोयटे, शंकर आडेपवार, गोविंद कुकर, जाबेर खान पठाण, बालाजी चाटे, अय्युब भाई, रवी मुळे, गोपाळ आंधळे, अमित केंद्रे, अमर रोडे, सुरेश नानवटे यांसह न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, संतोष रोडे, नगरसेवक, पदाधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. 

परळी शहराने मला राजकीय आयुष्यात नेहमीच भक्कम साथ दिली असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल, त्याचबरोबर वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भक्त निवासाचे कामही वेळेत पूर्ण होईल असा विश्वास ना. मुंडेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले. माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या इतर विकासकामांची माहिती दिली, तर सूत्रसंचालन सभापती गोपाळ आंधळे यांनी केले.(Dhananjay Munde News)