पालकमंत्र्यांनी केला पत्रकारितेचा अपमान

बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर पालकमंत्र्यांनी मोठ्या रुबाबात दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा फराळ केल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे आवाहन केले.

पालकमंत्र्यांनी केला पत्रकारितेचा अपमान
Dhananjay Munde News

पालकमंत्र्यांनी केला पत्रकारितेचा अपमान

बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर पालकमंत्र्यांनी मोठ्या रुबाबात दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा फराळ केल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे आवाहन केले. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर पालकमंत्र्यांनी मोठ्या रुबाबात दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा फराळ केल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे आवाहन केले. मात्र या ठिकाणी फराळ करण्यासाठी कसलीही सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती. जेव्हा पत्रकार नियोजन भवनातून बाहेर निघाले तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये जिल्हा माहिती अधिकारी यांनी एक बॉक्स देऊन येथे दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले नसल्याने आपणास गिफ्ट देत असल्याचे सांगत प्रत्येक पत्रकाराच्या हातामध्ये एक स्वादिष्ट मिठाईया असे नाव असलेला बॉक्स दिला. पुढे जाऊन पत्रकारांनी जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा असे निदर्शनास आले त्या बॉक्समध्ये छटाकभर चिवडा, एक लाडू आणि चिमूटभर शंकरपाळे आहेत. पत्रकारांनी पालकमंत्र्यांना काहीही न बोलता रस्त्याने येताना भेटलेल्या गोरगरीब लोकांना सदरील बॉक्सचे वितरण केले. व दिवाळीचा हा अल्पोपहार त्या गरिबांच्या तोंडी घातला. अशा प्रकारे दिवाळी फराळाचे वाटप करून पालकमंत्र्यांनी एक प्रकारे पत्रकारांचा अपमानच केला आहे.(Dhananjay Munde News)