अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांच्या 'त्या' तक्रारीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली असून या प्रकरणी श्री कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली आहे.

अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांच्या 'त्या' तक्रारीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल
Dhananjay Munde News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली असून या प्रकरणी श्री कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली आहे.(Dhananjay Munde News)

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अभियंता श्री कोकणे यांना संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी वर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्ष-संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही. 

सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे कार्यरत कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्याला कामांच्या देयक बिलांवर सह्या करण्यासाठी हातात कट्यार घेऊन धमकावले जाते, मला रिव्हॉल्व्हर द्या, अशी तक्रारवजा विनंती श्री कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. 

दरम्यान श्री कोकणे यांनी संबंधितांविरोधात पोलीसात तक्रार द्यावी, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे धनंजय मुंडे म्हणाले, तसेच श्री मुंडे यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना देखील दूरध्वनीवरून संपर्क करून, अभियंता श्री कोकणे यांना स्वतःहून संपर्क करून त्यांची तक्रार घ्यावी व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत. 

बीड जिल्ह्यात सर्वच विभागातील चांगले काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही सदैव आहोत. अधिकारी वर्गावर दबाव आणायचा किंवा तत्सम कोणताही प्रकार जिल्ह्यात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.(Dhananjay Munde News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/