नाथ प्रतिष्ठाण कडून 30 एप्रिल पासून परळीत डे-नाईट नॉक आउट क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार - धनंजय मुंडे

परळी मतदारसंघात आपण अनेक सामाजिक उपक्रमांच्या बरोबरच मागील अनेक वर्षांपासून मोठ्या स्वरूपात क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आलो असून, यावर्षी 30 एप्रिल पासून नॉक आउट प्रकारातील भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा परळीत आयोजित करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

नाथ प्रतिष्ठाण कडून 30 एप्रिल पासून परळीत डे-नाईट नॉक आउट क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार - धनंजय मुंडे
Dhananjay Munde News

नाथ प्रतिष्ठाण कडून 30 एप्रिल पासून परळीत डे-नाईट नॉक आउट क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार - धनंजय मुंडे

परळी मतदारसंघात आपण अनेक सामाजिक उपक्रमांच्या बरोबरच मागील अनेक वर्षांपासून मोठ्या स्वरूपात क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आलो असून, यावर्षी 30 एप्रिल पासून नॉक आउट प्रकारातील भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा परळीत आयोजित करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी मतदारसंघात आपण अनेक सामाजिक उपक्रमांच्या बरोबरच मागील अनेक वर्षांपासून मोठ्या स्वरूपात क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आलो असून, यावर्षी 30 एप्रिल पासून नॉक आउट प्रकारातील भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा परळीत आयोजित करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.(Dhananjay Munde News)

 

ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर संधी मिळावी यासाठी प्रत्येक गावातील खेळाडूंना संधी मिळेल अशा भव्य स्वरूपात ही स्पर्धा असेल, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली. स्व. पंडित अण्णा मुंडे स्मृती प्रतिष्ठाण तर्फे आयोजित सरपंच प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केली. 

गेल्या काही दिवसांपासून अत्यंत उत्साहात या स्पर्धा सुरू होत्या, यामध्ये आयपीएल च्या धर्तीवर परळीतील विविध 10 संघ मालकांनी तब्बल 200 खेळाडूंना आयपीएल प्रमाणे विकत घेऊन या स्पर्धा खेळवल्या गेल्या. यामध्ये अल्ताफ पठाण यांचा ए पी चॅलेंजर्स हा संघ विजेता ठरला असून या संघास 1 लाख 5 हजार 555 रुल्ये रोख व सरपंच चषक पारितोषिक तर उपविजेता ठरलेल्या माणिकभाऊ फड यांच्या राजगड वॉरिअर्स या संघास 75 हजार 555 रुपये रोख व सरपंच चषक उपविजेते पारितोषिक ना. धनंजय मुंडे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

या कार्यक्रमास बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव सिरसाट, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, माणिकभाऊ फड, यांसह वैजनाथ सोळंके, विश्वांभर फड, शंकर आडेपवार, विजय भोईटे, आयोजक सुशील दादा कराड व त्यांचा मित्र परिवार यांसह पंच कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते. 

धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद 11 धावा

दरम्यान उपांत्य फेरीत धनंजय मुंडे यांनीही एका संघाकडून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. अगदी लहानापासून क्रिकेटची आवड असलेले धनंजय मुंडे हे संधी मिळेल तेव्हा क्रिकेट खेळायचा आनंद घेत असतात. 

उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या धनंजय मुंडे यांनी अवघ्या 7 चेंडूत 11 धावा ठोकल्या, त्यात दोन चौकरांचा समावेश होता. सुशील कराड यांनी फलंदाजी मध्ये त्यांना उत्कृष्ट साथ दिली.

नेत्रदीपक शिवजयंती सोहळ्यात धनंजय मुंडेंकडून पुष्पवृष्टी

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळा येथे नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने नेत्रदीपक शिवजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात व 'तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ - जय शिवराय' या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. फटाक्यांची भव्य आतषबाजी करत शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास माल्यार्पण करून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.(Dhananjay Munde News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/