मा. पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश सो। यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांतर्गत दिशा भरकटलेल्या मुलांसाठी खेळाचे साहित्य वाटप

मा. श्री. कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालक व दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांची शक्ती योग्य मार्गावर यावी या अनुषंगाने विशेष बाल पोलिस पथक यांचे मार्फतीने निगडी ओटा स्कीम व सांगवी येथे क्रीडा उपक्रम राबविण्यात येत.

मा. पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश सो। यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांतर्गत दिशा भरकटलेल्या मुलांसाठी खेळाचे साहित्य वाटप
Distribution of sports materials

मा. पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश सो। यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांतर्गत दिशा भरकटलेल्या मुलांसाठी खेळाचे साहित्य वाटप

मा. श्री. कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालक व दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांची शक्ती योग्य मार्गावर यावी या अनुषंगाने विशेष बाल पोलिस पथक यांचे मार्फतीने निगडी ओटा स्कीम व सांगवी येथे क्रीडा उपक्रम राबविण्यात येत.

पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सरोदे:

मा. श्री. कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालक व दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांची शक्ती योग्य मार्गावर यावी या अनुषंगाने विशेष बाल पोलिस पथक यांचे मार्फतीने निगडी ओटा स्कीम व सांगवी येथे क्रीडा उपक्रम राबविण्यात येत असून निगडी ओटा स्कीम येथील राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमासाठी चोंदे स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने फुटबॉल खेळाचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.(Distribution of sports materials)

या कार्यक्रमात बोलताना डॉ. सागर कवडे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी या उपक्रमांतर्गत लहान मुलांमधील गुन्हेगारी भावना संपवायची असेल तर त्यांना क्रीडा संजीवनी देणे गरजेचे आहे. खेळातून त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण होते, लहान मुलांमध्ये खूप मोठी ऊर्जा असते. तिला योग्य दिशा दिली तर चांगले व्यक्तिमत्व घडते. मारामारी करून कारागृहात जाण्यापेक्षा चांगल्या संगतीत राहून खेळ खेळून उत्तम खेळाडू व्हा. संगत महत्वाची असते. लहान मुलांमधील गुन्हेगारीसंपवायची असेल तर क्रीडाची संजीवनी महत्वाची आहे. तुम्ही दोन पावले चाललात तर आम्ही चार पावले तुमच्यासाठी चालू. ओटास्कीम सारख्या भागातील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत.
असे बोलून मार्गदर्शन केले. 

 सदर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन निगडी पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते.  यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे, पोलीस निरीक्षक शंकर डामसे, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे, प्रशिक्षक संदेश बोर्डे, राजीव भावसार, संपत निकम, भूषण लोहरे आदि उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून राबवत असलेल्या क्रीडा उपक्रमासाठी मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा प्रतिसाद कमी होता. दिवसेंदिवस मुलांचा प्रतिसाद वाढत आहे. आता सुमारे 100 पेक्षा अधिक मुले खेळण्यासाठी येतात. मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या माध्यमातून होत आहे. डॉ. सागर कवडे यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांचे राज्यभर कौतुक होत आहे. भरकटलेल्या पिढीला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे.


निगडीचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी सांगितले की, मागील अडीच महिन्यात ओटास्कीममध्ये केवळ एक शरीराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे. तिथली गुन्हेगारी हळूहळू संपत आहे. हा चांगला उपक्रम असल्याचेही ते म्हणाले.राजीव भावसार सामाजिक कार्यकर्ते) म्हणाले, "पोलीस आयुक्तांनी सुरू केलेला हा उपक्रम चांगला आहे. या उपक्रमासाठी खेळाचे साहित्य आयुक्तालायला देण्यात आले. मुलांनी खेळात चांगली कामगिरी करावी."

फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश पाटील म्हणाला, "तीन वर्षांपासून मी फुटबॉल खेळत आहोत. आम्हाला सुरुवातीला साहित्य मिळाले नाही. पण त्यातूनही प्रॅक्टिस सुरू ठेवली. आता खेळाचे साहित्य व प्रशिक्षण  मिळण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. याचा आम्ही चांगला फायदा करून घेऊ."(Distribution of sports materials)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले.

टीप- सदर या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/