डाॅ. भालचंद्र वाचनालय 1  नागरिक भरवणार प्रतिकात्मक वाचनालय

शहराचे वैभव असलेले डाॅ. भालचंद्र वाचनालय काम पूर्ण झाल्यानंतरही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याऐवजी संबंधित गुत्तेदाराने बांधकाम गोडाऊन केले आहे.

डाॅ. भालचंद्र वाचनालय 1  नागरिक भरवणार प्रतिकात्मक वाचनालय
Dr Bhalchandra Library

डाॅ. भालचंद्र वाचनालय 1  नागरिक भरवणार प्रतिकात्मक वाचनालय

शहराचे वैभव असलेले डाॅ. भालचंद्र वाचनालय काम पूर्ण झाल्यानंतरही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याऐवजी संबंधित गुत्तेदाराने बांधकाम गोडाऊन केले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी दि .7 शहराचे वैभव असलेले डाॅ. भालचंद्र वाचनालय काम पूर्ण झाल्यानंतरही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याऐवजी संबंधित गुत्तेदाराने बांधकाम गोडाऊन केले आहे. सदर वाचनालय नागरिकांसाठी त्वरित सुरू करावे या मागणीसाठी शहरातील नागरिकांच्या वतीने वाचनालयाच्या इमारतीसमोर प्रतिकात्मक वाचनालय भरवून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. (Dr Bhalchandra Library)

याबाबत परळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आज दि.6 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, डाॅ. भालचंद्र वाचनालय बीड जिल्ह्य़ातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक असे वाचनालय आहे. परळी शहराचे हे ज्ञानकेंद्र आहे. 

काम पूर्ण झाल्यानंतर सुध्दा वाचकांसाठी अद्याप वाचनालय उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्याऐवजी सध्या वाचनालयाची इमारत आणि परिसर संबंधित गुत्तेदाराने स्वतःचे बांधकाम गोडाऊन बनविले आहे. सर्वञ लोखंडी गज, खडी, वाळू, इको सॅड ,सिमेंटचे पोते यांचा साठा केलेला पहावयास मिळतो.सदर वाचनालय शहरातील नागरिकांसाठी त्वरित सुरू करावे अन्यथा  16 नोव्हेंबर रोजी डाॅ. भालचंद्र वाचनालयासमोर प्रतिकात्मक वाचनालय भरविण्याचा इशारा मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे. निवेदनावर रानबा गायकवाड, प्रेमनाथ कदम, बालाजी जगतकर, साकसमुद्रे, विकास वाघमारे, गणेश आदोडे, नवनाथ दाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(Dr Bhalchandra Library)