नगराध्यक्षांची आज अखेर  शब्दपूर्ती, शिवप्रेमींनी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार

नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर साहेब यांच्या संकल्पनेतुन छञपती संभाजी महाराज क्रीडांगण,बीड शहर या डिजीटल नामफलक चा लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

नगराध्यक्षांची आज अखेर  शब्दपूर्ती, शिवप्रेमींनी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार
Dr Bharatbhushan Kshirsagar

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर साहेब यांच्या संकल्पनेतुन छञपती संभाजी महाराज क्रीडांगण,बीड शहर या डिजीटल नामफलक चा लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या मल्टीपर्पज च्या छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावी अशी शिवप्रेमींची जुनी मागणी होती. त्यामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी क्रीडांगणावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित केला होता.(Dr Bharatbhushan Kshirsagar)

त्याच कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी या मल्टी पर्पज क्रीडांगणाचे नाव छत्रपती संभाजी महाराज किडांगण असे जाहीर केले होते. काल प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत क्रीडांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड शहर असे डिजिटल नामफलक लावण्यात आले. नगराध्यक्षांनी क्रीडांगणाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देऊन शब्द केल्याने शिवप्रेमींनी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.याप्रसंगी नरसिंग नाईकवाडे,विनोद मुळूक,भास्कर जाधव,विलास विधाते,किशोर पिंगळे,गणेश वाघमारे,मुखीद लाला,गंगाधर काळकुटे,जमील भाई,ॲड.महेश धांडे,राणा चव्हाण,विठ्ठल बहिर,सुमित धांडे,यांच्यासह आदि.उपस्थित होते.(Dr Bharatbhushan Kshirsagar)