डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु

डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु करण्यात आले....

डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु
Dr. D. Y. Paralysis treatment unit started at Patil Ayurveda Hospital

डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु

पुणे : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी  कुलपती आदरणीय  डॉ. पी.डी पाटील  सर व आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या प्रेरणेतून व आदरणीय ट्रस्टी डॉ. स्मिता जाधव  मॅडम  यांच्या संकल्पनेतून साकारलेले अद्ययावत सुसज्ज अशा  पॅरालीसीस आयुर्वेद ट्रीटमेंट सेंटरचे उदघाटन  सल्लागार डॉ. बी.पी. पांडे यांच्या हस्ते  करण्यात आले. दीप प्रज्जवलन प्राचार्य डॉ. जी.एच.येवला  यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत खाडे यांनी केले.

 विशेष पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ.जी.एच येवला म्हणाले “पक्षाघात  पॅरालिसिसमुळे येणारे अपंगत्व व व्याधी तसेच जीर्ण  पक्षाघात पॅरालिसिस यावर आयुर्वेद उपचार, पंचकर्म उपचार  त्याच बरोबर आवश्यकतेनुसार  ऍलोपॅथी उपचार केले जातील. पॅरालीसीस रुग्णाला शक्य तितक्या लवकर दैनंदिन व्यवहार स्वतंत्रपणे करण्यासाठी आयुर्वेद व पंचकर्म  उपचार महत्वाचे ठरतात. पक्षाघात झालेला रुग्ण अंथरुणाला खिळून  न राहता डॉक्टरांच्या प्रयत्नांनी तो बरा होऊ शकतो व आपली दिनचर्या पार पाडू  शकतो”.

सुसज्ज अशा या युनिटसाठी डॉ.डी. जी. दीपंकर, डॉ. प्रशांत खाडे, डॉ.पृथ्वीराज उगळे, डॉ. अभिजित शेखर, डॉ. प्रणेश  गायकवाड या पाच डॉक्टरांची  विशेष टीम  कार्यरत असणार आहे.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, कुलसचिव श्री दिलीप मोहिते, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. पृथ्वीराज उगळे, श्री अमोल पाटील  तसेच शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

सर्व नागरिकांना सूचित करण्यात  येते डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय नॉन कोव्हीड हॉस्पिटल असून येथे  सर्व आजारांवर उपचार करण्यात येत आहेत व  सर्व आवश्यक  काळजी घेऊन प्रसूती सुविधा उपलब्ध आहे.

पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके

________

Also see :  धुरापाडा येथे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

https://www.theganimikava.com/Distribution-of-free-educational-materials-at-Dhurapada