8 वर्षांचा आंदोलक, पत्रकारांच्या प्रश्नांना धाडधाड देतो उत्तर

हा व्हिडीओ पाहून नेटकरी दंग झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा दिसत असून तो दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे.

8 वर्षांचा आंदोलक, पत्रकारांच्या प्रश्नांना धाडधाड देतो उत्तर
Farmers Protest

8 वर्षांचा आंदोलक, पत्रकारांच्या प्रश्नांना धाडधाड देतो उत्तर

हा व्हिडीओ पाहून नेटकरी दंग झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा दिसत असून तो दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे.

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचे व्हिडीओ तर मोठ्या चवीने पाहिले जातात. लहान मुलांचे लडीवाळ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा मूड फ्रेश होतो. सध्या एक वेगळाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी दंग झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा दिसत असून तो दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे.(Farmers Protest)


सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंगद सिंग नावाचा एक आठ वर्षांचा मुलगा दिसत आहे. हा मुलगा अतिशय चलाख असून त्याची राजकीय परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे. शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांविरोधातील दिल्ली येथील आंदोलनाला त्याचा पाठिंबा आहे. तो मोदी सरकारवर जोरदार टीका करतोय. त्याच्या भोवती पत्रकारांनी गर्दी केली असून ते आठ वर्षाच्या या आंदोलकाला अनेक प्रश्न विचारत आहे. 


विशेष म्हणजे पत्रकार प्रश्नांचा भडीमार करत असले तरी तो विचलित न होता सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहे.सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पत्रकार आठ वर्षाच्या अंगद सिंगला अनेक प्रश्न विचारत आहेत. त्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरं देताना तो भाजपला सोडून कोणालाही मतदान करा असे आवाहन करत आहे. तसेच आम्ही सुजानगढ, पश्चिम बंगालला गेलो होतो. येथे भाजपची हार झाली.

आता उत्तर प्रदेशमध्येदेखील असेच होणार आहे, असा दावा हा छोटा मुलगा करताना दिसतो.या आठ वर्षीय मुलाचा हा व्हिडीओ नेटकरी मोठ्या आवडीने पाहत आहेत. त्याच्या मनात असलेली निडरता तसेच त्याची धडाकेबाज वृत्ती सर्वांनाच आवडली आहे. विशेष म्हणजे मोठं होऊन तो पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक करत आहेत.(Farmers Protest)

हा व्हिडीओ THE MITHILA या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे.