राज्यांमध्ये अतिवृष्टीचा कहर,आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यांमध्ये अतिवृष्टीचा कहर,आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू
Flood In Jammu Kashmir

राज्यांमध्ये अतिवृष्टीचा कहर,आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

 जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर तसंच लडाख येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात बुधवारी 16 जणांनी प्राण गमावले आहेत. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात बुधवारी पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाले आहेत. तर, हिमाचल प्रदेशात अचानक आलेल्या पुरामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण बेपत्ता आहेत. लडाखमध्येही कारगिलच्या विविध क्षेत्रांमध्ये ढगफुटी झाल्यानं 12 घरं आणि शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे.(Flood In Jammu Kashmir)

     हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेशकुमार मोखता यांनी सांगितलं की, लाहौल-स्पीती येथील उदयपूरच्या तोजिंग नाल्यात आलेल्या पूरात सात लोकांचा जीव गेला आहे, दोघं जखमी आहेत तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. तर चंबा येथेही दोन लोकांचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात एक महिला, तिचा मुलगा, जलविद्युत प्रकल्प अधिकारी आणि दिल्ली येथील एका पर्यटकासह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मोखता यांनी सांगितलं की, लाहौलच्या उदयपुरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पूरात दोन मजूर आणि एक खासगी जेसीबी मशीन वाहून गेली. उदयपुरातल्या तोजिंग नाल्यात झालेल्या पूरात 12 मजूर वाहून गेले. यापैकी सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले, दोघांची सुटका करण्यात आली आणि तीन अद्याप बेपत्ता आहेत. लाहौल-स्पितीचे उपायुक्त नीरज कुमार म्हणाले की, भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम कार्यरत आहे.

जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीत नाल्याच्या काठावर असलेली 19 घरे, 21 गौशाला आणि रेशन डेपोचंही नुकसान झालं आहे. दच्चन तहसीलच्या होन्जार गावात ढगफुटीमुळे बेपत्ता झालेल्या 14 जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस, सैन्य आणि राज्य आपत्ती निवारण दल यांच्यामार्फत शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ढगफुटी झालेल्या किश्तवाडमधील गावातून सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, तर इतर 17 जणांना वाचविण्यात आलं आहे.(Flood In Jammu Kashmir)

जीव गमावणाऱ्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. 14 बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.