बार्टीकडून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस - राहूल वाघमारे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी तसेच पोलीस व मिलटरी भरतीपूर्व मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात येत आहेत.

बार्टीकडून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस - राहूल वाघमारे
Free Competitive Exam Classes

बार्टीकडून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस - राहूल वाघमारे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी तसेच पोलीस व मिलटरी भरतीपूर्व मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात येत आहेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी तसेच पोलीस व मिलटरी भरतीपूर्व मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ९ डिसेंबरच्यापूर्वी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी केले आहे.(Free Competitive Exam Classes)


 प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रासहीत अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल केल्यानंतर पात्र उमेदवारांची रविवार १२ डिसेंबर २०२१ रोजी  चाळणी परीक्षा घेवून उमेदवारांची गुणानुक्रमे कोचिंगसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार दि. १५  डिसेंबर स्पर्धा परिक्षा क्लासेस सुरू होणार आहेत. बँक, रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान दरमहा ६ हजार रूपये विद्यावेतन तसेच निःशुल्क वाचन साहित्यासाठी ५ हजार किमतीच्या पुस्तकांच संच व ऑनलाईन स्टडी साहित्य तसेच  पोलीस व मिलटरी भरतीपूर्व मोफत स्पर्धा कोचिंगसाठी ५ हजार रुपये विद्यावेतन आणि शूज व इतर साहित्य खरेदीसाठी ३ हजार रुपये संस्थेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी,पुणे मार्फत स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण घेतले असेल अशा विद्यार्थ्यांची जरी गुणानुक्रमे निवड झालेली असली तरी त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन व पुस्तकांचा संच दिला जाणार नाही. या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा तसेच अनुसूचित जातीचा असला पाहिजे. अर्जदाराचे वय वर्ष किमान 18 ते 3४ पोलीस व मिलटरी  कोचिंगसासाठी १९ ते ३२ वर्ष असले पाहिजे. तर शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 व 12 वी असणे आवश्यक आहे. तरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी या मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेसचा लाभ घ्यावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी केले आहे.

 दम्यान विद्यार्थ्यांनी आपला अर्ज सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स.मा.गर्गे वाचनालय कॅनल रोड, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजव, तुळजाई चौक बीड येथे दाखल करावा काही अडचण असल्यास राहूल वाघमारे यांच्याशी  9960253461, प्रा.अविनाश वडमारे 9588467377, सचिन काकडे 9970221823 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस भरतीसाठी महिला उमेदवाराची उंची किमान 155 सेंटिमीटर असने गरजेचे आहे तसेच पुरुष उमेदवाराची उंची किमान 165 सेंटिमीटर असणे आवश्यक आहे. तर छाती 79 सेंटीमीटर व फुगवून 85 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. पोलीस व मिलिटरी भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणी च्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू  राहणार आहेत.(Free Competitive Exam Classes)