निलेश साबंरे संस्थापित जिजाऊ संस्थेच्या वतीने खोडाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

माजी उपाध्यक्ष तथा माजी सभापती जिल्हा परिषद पालघर संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने खोडाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले आहे.

निलेश साबंरे संस्थापित जिजाऊ संस्थेच्या वतीने खोडाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
Free eye check up camp

माधुरी आहेर मोखाडा:

माजी उपाध्यक्ष तथा माजी सभापती जिल्हा परिषद पालघर संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने खोडाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले आहे.या नेत्र तपासणी शिबीरात १९४ नागरीकांची तपासणी करण्यात आली असून ११२ नागरीकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत.तर ३२ नागरिकांच्या डोळ्यावर भक्ती वेदांत रूग्णालय संचलित श्री भगवान महादेव साबंरे रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.मोखाडा तालुका हा अतिदुर्गम आदिवासी तालुका असून त्यातील गरीब,गरजूंना पैशाअभावी तपासणीसाठी गरज असतांना देखील डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाता येत नाही.(Free eye check up camp)

ही अडचण ओळखून निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खोडाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर राबविले आहे.जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात वर्षभर सातत्याने अशा प्रकारचे विविध समाजोपयोगी उफक्रम राबवण्यात येत असतात.अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांना शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने व त्यांना एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करता यावा म्हणून जीजाऊ संस्थेच्या वतीने  मोखाडा येथे वाचनालय सुरु करण्यात आले आहे.

नुकतेच कृतज्ञतेची भाऊबीज या उपक्रमातून निलेश सांबरे यांनी जवळपास दहा हजार आशाताई,परिचारीका,अंगणवाडी सेविका,डॉक्टर व पोलीस भगिनींना कृतज्ञतेची भाऊबीज या उपक्रमांतर्गत भाऊबीजेनिमित्त पैठणी भेट देऊन त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.या नेत्रतपासणी शिबिराला माजी नगराध्यक्ष रविंद्र खुताडे, सरपंच प्रभाकर पाटील,माजी उपसरपंच कदम व जिजाऊ टिम आदि उपस्थित होते.सर्वच स्तरांतून या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल जिजाऊचे कौतुक होत आहे.(Free eye check up camp)