उद्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत खटोड प्रतिष्ठान व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर
Free eye check up camp

उद्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत खटोड प्रतिष्ठान व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत खटोड प्रतिष्ठान व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा मीडियातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.(Free eye check up camp)


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य संदर्भात दर्पण सप्ताहाचे आयोजन यावर्षी करण्यात आलेले आहे. उद्या सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व सचिव सुशील खटोड यांच्या पुढाकारातून आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या दरम्यान प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व घटका अंतर्गत पत्रकार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरा अंतर्गत डोळ्यांची पूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांना चष्मा लागेल त्यांना अत्यल्प दरामध्ये चष्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर जर कोणाला नेत्रदोष आढळून आले, शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर ती देखील अत्यल्प दरात अथवा विनामूल्य करण्यासाठी पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे. तेव्हा बीड जिल्ह्यातील पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक, प्रिंट व सोशल मीडियातील सर्व घटकांतर्गत कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने वैभव स्वामी यांनी केले आहे.(Free eye check up camp)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
 https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/