व्हेंचर फाउंडेशन तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेल्या व्हेंचर फाउंडेशनतर्फे पवई (मुंबई) येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी वैद्यकीय तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.....
व्हेंचर फाउंडेशन तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेल्या व्हेंचर फाउंडेशनतर्फे पवई (मुंबई) येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी वैद्यकीय तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ७० ते ८० रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विनामूल्य तपासणी करण्यात येऊन मोफत औषधोपचार करण्यात आला. आजपर्यंत व्हेंचर फाऊंडेशन संस्थेने जवळपास ७० ठिकाणी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरे घेतली आहेत. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. सद्या कोरोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे लोकांचे आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे.
ह्या आरोग्य तपासणी कार्यक्रमात व्हेनचर फाऊंडेशनचे संस्थापक विक्रांत राऊळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर नेरकर, हूमेनिष्ट मुअमेंट ऑफ इंडियाचे संस्थापक अल्ताफ सय्यद, रवी गोडगे, नितीन गोडगे, देविका गोडगे, वीरेंद्र खडका आदी मान्यवरांनी उपस्थितीती दर्शवली होती. सामाजिक कार्यात अग्रेसर आलेल्या व्हेनचर फाऊंडेशनने कोरोना काळात ज्यांनी जीवाची पर्वा न करता निष्ठेने आपले कर्तव्य बजावले असे डॉकटर, नर्स, पोलिस बांधव, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार बंधू यांनाही कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला असून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केले आहे.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
______
Also see : कल्याणात रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन