गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून नेरूळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल
Gajanan Kale News

गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून नेरूळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून नेरूळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचा पत्नीचा आरोप आहे.(Gajanan Kale News)

शारिरीक छळवणूक, जातीवाचक शिवीगाळ आदी कलमांखाली गजानन काळेंवरती गुन्हा
मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचा त्यांच्या पत्नीने FIR मध्ये उल्लेख केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरुळ पोलिस स्थानकात गजाजन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने गुन्हा नोंदविला आहे. रंग, जात यावरुन आपला पती सतत टोमणे मारत असल्याचं पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा आरोप गजाजन काळे यांच्या पत्नीने केला आहे.

 
गजानन काळे यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचं अनेक वेळा माझ्या निदर्शनास आलं आहे. त्याला येणारे फोन कॉल, मेसेजवरुन ते लक्षात येतं. मी त्याला वारंवार समजून सांगायचे, पण माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असं म्हणून तो मला मारहाण करायचा, असंही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.

2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही.(Gajanan Kale News)

तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.