नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे.

नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख  यांची प्रकृती चिंताजनक आहे.

 शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डॉक्टर नातवाने म्हणजेच डॉ. अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सोलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. गणपतराव देशमुखांनी वयाची 96 वर्षे पूर्ण केली आहेत.(Leader Ganapatrao Deshmukh's health is critical)

एवढं वय असूनही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते, जनसामान्यांचे प्रश्न तडीस लावून नेते होते.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशय खडे आहेत. त्यावरचं त्यांचं ऑपरेशन पार पडलंय. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहेगणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.(Leader Ganapatrao Deshmukh's health is critical)

1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.