पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या वडिलांचं निधन

गौतमी पाटील हिच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. तिचे महाराष्ट्रभरात चाहते आहेत. या सर्व चाहत्यांना धक्का देणारी मोठी आणि अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या वडिलांचं निधन
Gautami Patil Father

पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या वडिलांचं निधन

गौतमी पाटील हिच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. तिचे महाराष्ट्रभरात चाहते आहेत. या सर्व चाहत्यांना धक्का देणारी मोठी आणि अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती. तीन-चार दिवसांपूर्वी बेवारस अवस्थेत तिचे वडील सापडलेले होते.

आई आणि वडील पूर्वीच वेगळे झाल्याने गौतमी आईसोबत राहाते. जेव्हा गौतमी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली तेव्हा तिचे वडीलदेखील माध्यमांमध्ये झळकले होते. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

काही दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचं सांगितलं होतं. अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धुळ्यातील दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील हे बेवारसपणे पडलेले आढळून आले होते. सुरुवातीला ते कोण आहेत, याची त्यांना जाणीव नव्हती. त्यांनी रविंद्र पाटील यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या खिशातील आधार कार्डमुळे त्याचं नाव कळालं. चव्हाण यांनी सोशल मीडियात त्यांच्याबद्दल माहिती टाकली. त्यानंतर ते गौतमीचे वडील असल्याचं लक्षात आलं होतं.

रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं. याबाबतचं वृत्त गौतमीला माहिती समजल्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुण्यात नेलं होतं. रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त बिघडली होती. त्यामुळे गौतमीने त्यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत गौतमीने व्हिडीओ जारी करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं सांगितलं होतं.

रवींद्र पाटील यांना दारुचं व्यसन होतं. या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला घेऊन पुण्याला गेली होती. गौतमी पुण्यात लहानाची मोठी झाली. या दरम्यान तिने डान्स क्लास लावला. तसेच ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं. गौतमीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ती प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती. या दरम्यान गौतमीने एका चित्रपटातही काम केलं. असं असताना गौतमीचं आज पित्याचं छत्र हरपलं आहे.