वायरमन मनला शिवी गाळ, दोघांवर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल

गेवराईवीज वापराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वागदरा तांडा (ता. गेवराई) येथील विद्युत ' पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या वायरमनला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

वायरमन मनला शिवी गाळ, दोघांवर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल
Gevrai Police Station

वायरमन मनला शिवी गाळ, दोघांवर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल

गेवराईवीज वापराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वागदरा तांडा (ता. गेवराई) येथील विद्युत ' पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या वायरमनला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराईवीज वापराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वागदरा तांडा (ता. गेवराई) येथील विद्युत ' पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या वायरमनला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश बळिराम जाधव, विकास सखाराम जाधव (दोघे रा. वागदरा तांडा. गेवराई) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. वायरमन सुनील कचरू काटकर यांनी याबाबत फिर्याद दिली. गेवराई तालुक्यातील वागदरा तांडा येथील वस्तीवरील अनेक लोकांकडे वीज देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे.(Gevrai Police Station)

सध्या महावितरणकडून थकबाकी वसूलीसाठी वीज तोडणी मोहीम सुरु आहे. या आदेशाने वायरमन सुनील कचरू काटकर विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी वायरमन सुनील काटकर हे गेले होते.येथील विद्युत पुरवठा बंद करत असताना रमेश बळिराम जाधव, विकास सखाराम जाधव यांनी श्री. काटकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सुनील काटकर यांच्या फिर्यादीवरून रमेश जाधव, विकास जाधव याच्यांवर अडथळा आणल्याप्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Gevrai Police Station)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/