वाडीमालका विरुद्ध महिला अत्याचाराची तक्रार जनवादी महिला संघटनेने घोलवड पोलीस ठाण्यात केली दाखल

घोलवड येथील हरचंद नावाचा व्यापारी चार आदिवासी महिलांशी लग्न करून त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याची तक्रार माकपचे विभाग सेक्रेटरी चंद्रकांत घोरखना यांनी पोलिसात केली आहे.

वाडीमालका विरुद्ध महिला अत्याचाराची तक्रार जनवादी महिला संघटनेने घोलवड पोलीस ठाण्यात केली दाखल
Gholwad police station

वाडीमालका विरुद्ध महिला अत्याचाराची तक्रार जनवादी महिला संघटनेने घोलवड पोलीस ठाण्यात केली दाखल

घोलवड येथील हरचंद नावाचा व्यापारी चार आदिवासी महिलांशी लग्न करून त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याची तक्रार माकपचे विभाग सेक्रेटरी चंद्रकांत घोरखना यांनी पोलिसात केली आहे. 

डहाणू प्रतिनिधी शेखर पवार:

घोलवड येथील हरचंद नावाचा व्यापारी चार आदिवासी महिलांशी लग्न करून त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याची तक्रार माकपचे विभाग सेक्रेटरी चंद्रकांत घोरखना यांनी पोलिसात केली आहे. महिला अत्याचार प्रकरणी आदिवासी अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संधर्भात आपण उद्या संबंधिताला समजपत्र देऊन त्याची चौकशी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाखरे यांनी सांगितले.(Gholwad police station)


डहाणू तालुक्यात मालकांकडून वाडीत काम करणाऱ्या आदिवासी महिलांवर अत्याचार केले जात असल्याचे अनेक प्रकार घडतात. याच प्रकाराने घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हरचंद नावाच्या वाडीमालकाने तब्बल तीन  आदिवासी महिलांशी लगट करून त्याचे संसार उद्ध्वस्त केल्याचे आरोप तक्रार अर्जात केले आहेत. तो जुगार, दारूचा बेकायदा व्यवसायही करीत असल्याची तक्रार असून आदिवासी महिलांच्या अत्याचारामुळे याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहेत.(Gholwad police station)

पीडित आदिवासी महिलांना न्याय न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येईल.

विभाग सेक्रेटरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - घोरखना

संबंधित पीडित महिलांच्या वैयक्तिक तक्रार प्राप्त झालेली नाही. तरी आपण त्या इसमास नोटीस पाठवून त्याची चौकशी करून पुढील कारवाई करू

पोलीस निरीक्षक घोलवड पोलीस ठाणे - रवींद्र पाखरे

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/