सरकारचं कोट्यवधी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; 50 लाखांचा लाभ

विमा योजनेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे अपघात कव्हर मिळते. आता ही विमा योजना 20 एप्रिलपासून एक वर्षासाठी लागू होणार आहे.

सरकारचं कोट्यवधी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; 50 लाखांचा लाभ
Gifts to employees

सरकारचं कोट्यवधी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; 50 लाखांचा लाभ

विमा योजनेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे अपघात कव्हर मिळते. आता ही विमा योजना 20 एप्रिलपासून एक वर्षासाठी लागू होणार आहे.

देशातील कोरोनाविरोधातील लढ्यात जे लाखो आरोग्यसेवक मनोभावे रुग्णांची सेवा करतायत, त्यांना मोदी सरकारने मोठी भेट दिलीय. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज  अंतर्गत आरोग्य कामगारांसाठी विमा योजनेचे कव्हरेज सरकारने एक वर्षासाठी वाढविले. विमा योजनेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे अपघात कव्हर मिळते. आता ही विमा योजना 20 एप्रिलपासून एक वर्षासाठी लागू होणार आहे. 

गेल्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत कोरोना साथीच्या विरुद्धच्या युद्धात सरकारने आरोग्य सेवा कामगारांसाठी विमा योजना सुरू केली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

ते ट्विटमध्ये म्हणाले, कोरोना व्हायरसच्या साथीच्या वेळी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज   ने कोविड 19 मध्ये आपला जीव गमावलेल्या कोरोना व्हॉरियर्सच्या अवलंबितांना संरक्षण प्रदान केले. या योजनेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, कुटुंबास 50 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते.

मंत्रालयाने म्हटले आहे की, गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत कोरोना वॉरियर्ससाठी विमा पॉलिसीद्वारे 24 एप्रिलपर्यंत दावा केला जाऊ शकतो.देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक आहे. रेकॉर्ड ब्रेक घटनांची सातत्याने नोंद होत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोविड 19 मधील 2,95,041 नवीन प्रकरणे नोंदली गेली. तर 2,023 लोक मृत्युमुखी पडलेत.

एका दिवसात ही नवीन प्रकरणे आणि मृत्यूची सर्वाधिक घटना आहेत. कोरोनानं देशात आतापर्यंत 1,82,553 लोकांचा मृत्यू झालाय.